Share

बाबो! पगारापेक्षा ५०० पट संपत्ती, पोलिसाचा काळा पैसा पाहून अधिकारीही झाले हैराण

Income-tax-raid

ओडिशातील एका पोलीस अधिकाऱ्याच्या घरावर दक्षता विभागाच्या पथकाने छापा टाकला. या छाप्यात दक्षता विभागाच्या अधिकाऱ्यांना मोठं घबाड सापडलं आहे. ओडिशातील या पोलीस अधिकाऱ्याने भ्रष्टाचार करून कमाईच्या ५०० पट संपत्ती जमा केल्याचे समोर आले आहे. या छाप्यात पोलीस अधिकाऱ्याच्या घरातून बीएमडब्ल्यू कार, स्पोर्ट्स बाईकसह सुमारे ११ कोटींची अवैध मालमत्ता जप्त करण्यात आली आहे.(police officer house raid by income tax)

पोलीस अधिकारी त्रिनाथ मिश्रा यांच्या घरावर दक्षता पथकाने छापा टाकला आहे. दक्षता पथकाने त्रिनाथ मिश्रा यांच्याकडून १ कोटी रुपयांची बीएमडब्ल्यू एक्स ७ कार, १७ लाख रुपयांची ह्युंदाई क्रेटा कार, मारुती बलेनो, शेवरलेट ट्रेलब्लेझर एलटीझेड कार, ५.३ लाख रुपयांची जीटीआर, २५० ह्योसंग बाइक आणि इतर वस्तू जप्त केल्या आहेत.

पोलिस अधिकारी त्रिनाथ मिश्रा यांच्या पत्नी आणि त्यांच्या दोन मुलांच्या नावावर अनेक भूखंड असून ते बेकायदेशीरपणे खरेदी करण्यात आल्याचे दक्षता विभागाच्या पथकाचे म्हणणे आहे. या प्रकरणात दक्षता एसपी अक्षय कुमार मिश्रा यांनी सांगितले की, “बुधवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पोलीस अधिकारी त्रिनाथ मिश्रा यांच्या घरावर छापा टाकला होता. बेकायदेशीरपणे मालमत्ता जमवल्याप्रकरणी त्रिनाथ मिश्रा यांना अटक करण्यात आली आहे.”

गेल्या काही दिवसांमध्ये ओडिशाच्या दक्षता विभागाने भ्रष्ट अधिकार्‍यांवर कारवाई तीव्र केली आहे. गेल्या दीड महिन्यात २३ सरकारी अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. त्यात ४ वर्ग-1 अधिकाऱ्यांचाही समावेश आहे. काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशातील नोएडामधील एका माजी आयपीएस अधिकाऱ्याच्या घरावर आयकर विभागाने छापा टाकला होता.

आयकर विभागाने टाकलेल्या या छाप्यात माजी आयपीएस अधिकाऱ्याच्या घराच्या तळघरातून साडेसहाशे लॉकर्स जप्त करण्यात आले आहेत. या लॉकर्समध्ये आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांना कोट्यवधी रुपये सापडले होते. या लॉकर्समधून आयकर विभागाने ५ कोटी ३५ लाख रुपये वसूल केले होते. आयकर विभागाच्या पथकाने हे लॉकर्स आपल्या ताब्यात घेतले होते.

हरियाणाच्या गुरुग्राममध्ये देखील सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) डेप्युटी अधिकाऱ्याच्या घरावर आणि इतर ठिकाणांवर छापे टाकून आयकर विभागाने अमाप संपत्ती जप्त केली होती. या छाप्यात बीएसएफ डेप्युटी अधिकाऱ्याच्या घरातून १ कोटी रुपयांचे दागिने आणि १४ कोटी रुपयांची रोकड आयकर विभागाकडून जप्त करण्यात आली होती.

महत्वाच्या बातम्या :-
राज्यमंत्री पदाचा दर्जा असलेल्या शिवसेनेच्या बड्या नेत्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल, पुण्यात आणि गोव्यात नेऊन..
धक्कादायक! बेरोजगार मुलं, दारूचं व्यसन, रोजची भांडणं; वैतागलेल्या आईने उचलले टोकाचे पाऊल
“अनेक संघांनी संपर्क केला, मात्र…”, शाकिबला कोणीही विकत न घेतल्यामागचे पत्नीने सांगितले ‘कारण’

ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now