आईला सरपंच करणाऱ्या पोलिस निरीक्षकाचा विजयी मिरवणूकीत धक्कादायक मृत्यू

औरंगाबाद | औरंगाबाद मध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. आईची सरपंच पदी निवड झाली. त्यानिमित्त काढलेल्या विजयी मिरवणुकीत नृत्य करत असताना पोलिस कर्मचाऱ्याचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. यामुळे आनंदात असलेल्या एका कुटूंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

औरंगाबाद पोलिस दलातील कर्तव्यदक्ष, मनमिळावू पोलिस निरिक्षक सुभाष रावसाहेब खंडागळे यांचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला आहे. त्यांच्या निधनाने खंडागळे परिवारासह संपुर्ण मांडवा गाव शोकसागरात बुडालं आहे.

पोलिस अधिकारी असूनही सुभाष खंडागळे हे गावचा विकास करण्यासाठी नेहमी धडपडत असत. गावातल्या लोकांना त्यांनी अनेक सोयीसुविधा पुरवल्या. स्वत:च्या मेहनतीच्या जोरावर, दिवस रात्र एक करून त्यांनी आईला ग्रामपंचायत सदस्यपदी निवडून आणले. पुढे त्यांच्या हातात सरपंचपदाची जबाबदारी देण्यात आली.

आईची एकमताने सरपंचपदी निवड झाल्याने आपल्या मेहनतीला यश आल्याचे पाहून खंडागळे खुश होते. मांडवा गावातील लोकांनी (दि.८) जंगी मिरवणूक काढायची ठरवलं. त्यानुसार गावातील लोक तयारीला लागले. प्रत्येकाच्या घरासमोर रांगोळी, अंगणात सडा, गूलाल फुलांची उधळण, बॅंड याचे नियोजन करण्यात आले. त्यानुसार बॅंडच्या तालावर मिरवणूकीला सुरूवात झाली.

मिरवणुकीत लहान थोरांनी डान्स करण्यास सुरूवात केली. मिरवणूक रंगात येत असल्याचं पाहून खंडागळे यांनाही नृत्य करण्याचा मोह आवरला नाही. त्यांनीही गाण्याच्या तालावर ठेका धरला. मात्र नियतीला त्यांचा आनंद मान्य नव्हता.

नृत्य करत असतानाच अचानक ते जमीनीवर कोसळले. त्यानंतर सर्वांचा एकच गोंधळ उडाला. खंडागळे यांना तात्काळ औरंगाबाद शहरातील खासगी दवाखान्यात दाखल करण्यात आले. मात्र उपचारापुर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली.

सरपंचपदाचा कारभार आपल्या आईच्या हाती यावा. यासाठी घेतलेल्या मेहनतीला फळ मिळाले. पण त्याचा आनंदोत्सव साजरा करताना लाडक्या लेकाचा झालेला मृत्यूने त्यांच्या आईला जबर मानसिक धक्का बसला आहे.

कामाशी प्रामाणिक असलेल्या, नाव ऐकताच गुंडांचा थरकाप उडवणाऱ्या, चलाख, मनमिळावू अशा पोलिस अधिकाऱ्याच्या जाण्याने औरंगाबाद पोलिस दलावर आणि मांडवा गावावर शोककळा पसरली आहे.

महत्वाच्या बातम्या-
“पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त”, मालिका संपल्याने बबड्या झाला भावूक
हातगाडीवर काम करून पोट भरत होती ‘ही’ अभिनेत्री; आज करते मराठी टेलिव्हिजनवर राज्य
दुर्देवी! आईची सरपंच पदी निवड झाली, अन् विजयी मिरवणूकीतच लेकाने सोडला प्राण
पिवळं सोनं! हळदीला विक्रमी भाव, प्रतिक्विंटल शेतकऱ्यांना ३० हजार रुपये

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.