खाकी वर्दीला सलाम! आईच्या मृतदेहाजवळ दोन उपाशी होते बाळ, पोलिसांनी भरविला मायेचा घास

सध्या राज्यभरात अनेक धक्कादायक घटना घडताना दिसत आहे. असे असतानाच भोसरीमध्ये आईच्या मृतदेहाजवळ एक चिमुकला दोन दिवसांपासून उपाशी बसलेल्याची घटना घडली आहे. भुकेने व्याकूळ झालेल्या बाळाला आता पोलिसांनी मायेचा घास भरवला आहे.

दीघीतील मॅगझीन चौकाकडून भोसरीकडे जाणाऱ्या रस्त्यावरील फुगेवस्ती येथे हा प्रकार घडला आहे या ठिकाणी एका बंद खोलीत एका महिलेचा मृत्यु झाला आहे. त्यावेळी त्या महिलेचे दिड वर्षाचे बाळ त्या मृतदेहाजवळच दोन दिवस उपाशी होते. आता त्या बाळाला पोलिसांनी घास भरवला आहे.

सरस्वती राजेश कुमार असे मृत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तसेच त्यांचे वय २९ असून त्या मुळ उत्तर प्रदेशच्या होत्या. मिळालेल्या माहितीनुसार, सरस्वती आणि तिचा पती दोन महिन्यांपुर्वी दिड वर्षांच्या मुलासह फुजेवस्तीत राहण्यास आले होते.

राजेश सध्या मुळगावी उत्तर प्रदेशला गेल होता. असे असताना दोन दिवस खोली बंद असून त्यातून दुर्दंधी येत होती. ही माहिती घरमालकाने पोलिसांनी दिली. त्यानुसार पोलिस घटनास्थळी दाखल झाले असता सरस्वती यांचा मृतदेह खोलीत आढळून आला. तसेच तिथे दोन वर्षांचा मुलगा आईच्या मृतदेहाजवळच बसलेला होता.

तो चिमुकला दोन दिवस उपाशी असल्याने तो भुकेने व्याकूळ झालेला होता. हे महिला पोलिस सुशिला गभाले आणि रेखा वाजे यांच्या लक्षात आले असताच त्याला जवळ घेऊन दुध व बिस्किट खाऊ घातले.

दरम्यान, वायसीएम रुग्णालयात मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले आहे. आता शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतर मृत्युचे कारण स्पष्ट होऊ शकणार आहे. सरस्वतीच्या पतीला फोन करुन या घटनेबाबत माहिती देण्यात आली आहे. पती राजेश कुमार आल्यानंतर त्याच्या ताब्यात हा मृतदेह देण्यात येणार आहे, असे पोलिसांनी सांगितले आहे.

महत्वाच्या बातम्या-

भारतातील कोरोना परीस्थीतीवर बोलताना अक्षरश ढसाढसा रडली शिल्पा शेट्टी; म्हणाली…
‘दिल दोस्ती दुनियादारी’ मालिकेतील लोकप्रिय अभिनेत्रीचा विवाह झाला संपन्न; नवरा आहे प्रसिद्ध अभिनेता
तुम्ही मला बुधवार पेठेत कधी पाहिलं? तुम्ही काय करत होता तिथे? युजरच्या कमेंटवर संतापली मानसी नाईक

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.