पोलीसांची भयानक क्रुरता; मास्क नाही घातला म्हणून तरूणाच्या हातापायावर ठोकले खिळे

कोरोनाच्या काळात पोलीस, आरोग्य कर्मचारी आणि डॉक्टर सर्वानी खूप मोठी जबाबदारी पार पाडली आहे. कुठे कुठे तर पोलिसांचे वेगळेच रूप सामान्य जनतेला पाहायला मिळाले. त्यामुळे सामान्य जनता संतप्त झाली आहे.

उत्तर प्रदेश राज्यात तर पोलिसांचे क्रूर रूप पाहायला मिळाले. बरेली जिल्ह्यात तरुणाने मास्क न घातल्यामुळे त्याच्या पायाला खिळे ठोकळ्याची दुर्दैवी घटना घडली आहे. रायबरेलीत पण काही घटना घडून आल्याच्या दिसून आल्या आहेत.

रायबरेलीमध्ये पण काही तरुणांना पोलिसांनी जेलमध्ये नेऊन मारल्याचे उघड झाले आहे. बरेलीत राहणाऱ्या रणजित नावाच्या तरुणाच्या पायात खिळे ठोकल्याचे पण समोर आलं आहे. या प्रकरणामुळे राज्यातील जनतेत असंतोष पसरला आहे.

तरुणाच्या कुटुंबीयांनी सांगितले आहे की तो रात्री घराच्या बाहेर बसला होता. तिथे पोलीस आले आणि त्यांनी त्याला पकडून पोलीस ठाण्यात नेले. तिथे नेल्यावर त्याच्या हाता पायावर खिळे ठोकण्यात आले.

शिवाय त्याला पोलिसांनी मारहाण पण केली. तरुणाच्या घरच्यांचे हे आरोप मात्र पोलिसांनी फेटाळून लावले आहेत. पोलीस अधिकारी रोहित सजवान यांनी म्हटले आहे की, तरुण पूर्णपणे खोटा बोलत आहे.

पोलिसांनी त्याला २४ तारखेला पकडले होते. अटकेपासून बचाव व्हावा म्हणून त्याने खिळे ठोकल्याचा बनाव केला आहे. दुसरी घटना उत्तर प्रदेशातील मऊ जिल्ह्यातील आहे. तिथे एक तरुण घराबाहेर उभा असताना पोलिसांनी त्याला फरफटत नेत मारहाण केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

ताज्या बातम्या
तरुणीनं बारमध्ये लगावली आदित्य नारायणच्या थोबाडीत; पाहा प्रसिद्धीसाठी कसली घाणेरडी कृत्ये करतो

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर आहे करोडोंच्या संपत्तीचा मालक; मुंबईतच आहेत दोन आलिशान बंगले

दिशा वाकानी अर्थात जुन्या दयाबेनला विसरून जातील सगळे! शोमध्ये येणार नवीन चेहरा, सोबत अनेक ट्वीस्ट

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.