पोलिसांना नडणे तरूणीला चांगलेच भोवले, पोलिसांनी भर चौकात मारली तरूणीच्या कानाखाली

बंगळूरू | पोलिस आणि सर्वसामान्य नागरिकांमधील वादाच्या घटना आपण अनेकदा पाहतो. काहीजण तर रागाच्या भरात पोलिसांवर हात उचलतात. पोलिसही त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करून त्यांना शिक्षा देत असतात. अशीच एक घटना कर्नाटक राज्यात घडली आहे.

कर्नाटकच्या मांड्या जिल्हयात एका तरूणीने नो पार्किंगमध्ये स्कूटी पार्क केली होती. नो पार्कंगमधील वाहनांवर कारवाई करत असताना पोलिसांनी तिच्या गाडीवरही कारवाई केली. त्यानंतर तिची गाडी उचलून नेण्यात येत होती.

वाहतूक पोलिस कारवाई करत असताना ती तरूणी संतापली आणि तिने पोलिस कर्मचाऱ्यांसोबतच वाद घालण्यास सूरूवात केली. पोलिस तिची समजूत काढत होते. पण तरूणी ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती. तरूणी भर चौकात मोठमोठ्याने ओरडत पोलिसांच्याच अंगावर धावून जात होती.

तरूणीचं असं म्हणणं होतं की पोलिसांनी तिची गाडी उचलून घेऊन न जाता जागेवरच दंड घ्यावा. तरूणी गाडीवर बसून सांगत होती मी गाडीवरून खाली उतरणार नाही. तरूणी फोनवर कुणाशी तरी बोलत होती.

पोलिसांनी तिला खाली उतरण्यास सांगूनही ऐकत नसल्याने संतापलेल्या महिला पोलिस कर्मचाऱ्याने तिच्या थेट कानाखालीच मारली. त्यानंतर ती तरूणी आणखीनच भडकली आणि पुन्हा जोरजोरात भांडायला सुरूवात करते.

पोलिस कर्मचारी त्यानंतर तिला पोलिस स्टेशनमध्ये घेऊन जातात. मात्र अल्पवयीन असल्याने पोलिसांनी तिच्यावर कायदेशीर कारवाई न करताच समज देऊन सोडून दिले आहे.

पोलिस आणि तरूणीच्या भांडणाचा प्रकार उपस्थित असलेल्या अनेकांनी कॅमेऱ्यात कैद केला आहे. सोशल मिडियावर सध्या हा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

महत्वाच्या बातम्या-
जाणून घ्या आज काय करतात अभिनेते विनोद मेहराची मुलं?
नक्की कोण आहे ‘कारभारी लयभारी’ मालिकेत मुख्य अभिनेत्याची भुमिका निभावणारा कलाकार
बायकोने आधी नवऱ्याला सेक्स व्हिडिओ दाखवले, अन् नंतर त्याचे हातपाय बांधून केले ‘हे’ कृत्य
अबब! भारतात ‘या’ ठिकाणी प्रत्येक सेकंदाला तयार होणार १ इलेक्ट्रीक स्कूटर, OLA उभारणार कारखाना

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.