सुशांत प्रकरणी आदित्य ठाकरेंवर आरोप करणाऱ्या व्यक्तीला मुंबई पोलिसांनी ठोकल्या बेड्या

अभिनेता सुशांत सिंग राजपूतने १४ जुनला त्याच्या मुंबईच्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्यानंतर अनेक वाद निर्माण झाले आहेत. बॉलीवूडची खरी काळी बाजू लोकांसमोर येत आहे. म्हणून अनेकजण भडकले आहेत.

सुशांतच्या आत्महत्येनंतर बॉलीवूडमध्ये अनेक वाद निर्माण झाले आहेत. सर्वात मोठा वाद म्हणजे सुशांत सिंग राजपूत आणि त्याची मॅनेजर दिशा सालियान या दोघांच्या मृत्यूचा एकमेकांशी संबंध आहे. अनेकांनी या दोघांच्या मृत्यूचा संबंध आहे असा दावा केला होता.

आत्ता या प्रकरणी मुंबई पोलिसांनी एका वकिलाला अटक केली आहे. विभोर आनंद हा दिल्लीचा रहिवासी आहे. तो वकील असल्याचा दावा त्याने केला आहे. युवासेना नेते आदित्य ठाकरे आणि इतर गोष्टींबाबत वादग्रस्त पोस्ट आणि व्हिडिओ सोशल मीडियावर टाकल्याचा आरोप त्याच्यावर करण्यात आला आहे.

महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांचा सुशांत आणि दिशाच्या मृत्यू प्रकरणाशी संबंध असल्याचा दावा आनंदने केला होता. त्याचे ट्वीटर आकाउंट देखील ससपेंड करण्यात आले आहे.

आनंदने दिशा आणि सुशांतच्या मृत्यूचा एकमेकांशी संबंध आहे. असा दावा करणारा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला होता. त्यासोबतच दिशाच्या मृत्यूपूर्वी दिशावर सामूहिक बलात्कार झाला आहे. असा दावा करणाऱ्या व्यक्तीच्या व्हिडिओ देखील त्याने व्हायरल केला होता.

सोशल मीडियावर खोट्या बातम्या पसरवणे आणि विडिओ पोस्ट करणे. याबद्दल आनंदवर कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. आनंद सतत सोशल मीडियावर खोटे पोस्ट लिहित होता. त्याने या प्रकरणात महाराष्ट्रातील अनेक मोठ्या नेत्यांची नावे घेतली होती. आनंदला १९ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनवण्यात आली आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

कंगनाला न्यायालयाचा दणका; धार्मिक तेढ पसरवल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे आदेश

तुमचे काम महाराष्ट्राची मान उंचावणारे आहे! भाजपच्या शेलारांनी केले चक्क ठाकरेंचे कौतूक

महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय

‘त्या’ घटनेनंतर पानाला चूना लावनारा भाऊ कदम अवघ्या महाराष्ट्राच्या गळ्यातील ताईत बनला

गुळ, फुटाणे खाण्याचे फायदे ऐकाल तर थक्क व्हाल; पुरूषांसाठी तर लई भारी

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.