कडक सॅल्युट! वडिल वारले, आई हॉस्पिटलमध्ये, पोलिसांनी त्या मुलाला घेतले दत्तक

मेरठ पोलिस स्टेशनमध्ये एक मुलगा आला. तो खुप रडत होता. तो स्टेशनमधील तपेश्वर सागर यांच्याकडे गेला आणि त्यांना त्याने विचारले की, आता मी कोठे जाऊ? हा प्रश्न त्याने का विचारला यामागचे सत्य वाचून तुमच्याही डोळ्यात पाणी येईल.

तर झाले असे होते की त्या मुलाने आपल्या वडिलांना एका अपघातात गमावले. आणि त्याची आई मानसिक रूग्ण आहे. सध्या त्याची आई एका रूग्णालयात उपचार घेत आहे.

जेव्हा मुलाने स्टेशनमधील पोलिसांना विचारले आता मी कोठे जाऊ त्यानंतर तेथील पोलिसांनी जे केले ते त्यांच्या वर्दीवरील स्टारपेक्षा कमी नाहीये. मिळालेल्या माहितीनुसार, त्या मुलाचे नाव अनमोल आहे.

अनमोलच्या आईवर मेरठमधील एका हॉस्पिटलमध्ये सध्या उपचार सुरू आहेत. पुढील उपचारासाठी त्याच्या आईला आग्रा येथे पाठविण्यात येणार आहे. त्यामुळे तो एकटा पडला होता. काही दिवसांपुर्वी त्याचा वाढदिवस झाला होता.

अशावेळी जेव्हा तो मुलगा रडत रडत कंकरखेडा पोलिस स्टेशनमध्ये पोहोचला तेव्हा पोलिसांनी त्याला आधी शांत केले. त्याला चांगले वाटावे यासाठी केक कापून त्यांनी त्याचा वाढदिवस पोलिस स्टेशनमध्ये साजरा केला.

स्टेशनमधील इंस्पेक्टर तपेश्वर सागर म्हणाले की, जेव्हा पण मी अशा एकट्या मुलाला बघतो तेव्हा मला याचीच भिती वाटते की तो मुलगा गुन्हेगारीच्या वाटेवर तर नाही जाणार ना? पण मी जेव्हा त्या मुलाला बघितले तेव्हा मला त्याचे उज्ज्वल भविष्य दिसले.

तपेश्वर म्हणाले की अनमोलला खुप शिकण्याची इच्छा आहे. तो सध्या ऑनलाईन शिक्षण घेत आहे. त्याला मी सध्या कंप्युटर शिकवत आहे आणि त्याला मी काही पुस्तके आणून दिली आहेत. मी आता त्याचे एखाद्चा चांगल्या शाळेत ऍडमिशन करून देणार आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.