डॅशींग पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांना भर पत्रकार परीषदेत राग अनावर; वाचा पुर्ण किस्सा

पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त कृष्णा प्रकाश त्यांच्या धडाकेबाज कामगिरीसाठी ओळखले जातात. कृष्णा प्रकाश पत्रकारावर चिडल्याचे दिसून आले आहे. पिंपरी चिंचवड विधानसभा आमदार आण्णा बनसोडे यांच्या गोळीबार प्रकरणी पत्रकाराने प्रश्न विचारला होता.

पिंपरी चिंचवडचे आमदार आण्णा बनसोडे यांच्यावर गोळीबार झाल्याचे स्पष्ट झाले आहे का? असा प्रश्न कृष्णा प्रकाश यांना पत्रकारांनी विचारला होता. त्यावर कृष्णा प्रकाश यांनी तुम्ही पत्रकार नियोजनबद्ध कट रचून आलेला आहात. आमदार अण्णा बनसोडे यांचा मुलगा सिद्धार्थ बनसोडे याला आणि त्यांच्या साथीदारांना अटक केली.

इतकी चांगली आणि कठोर कारवाई करुनही तुम्ही प्रश्न विचारत आहात. तुम्हाला कुणी असे प्रश्न विचारा म्हणून नियोजन करुन पाठवले आहे का? असा प्रश्न विचारतानाच मी जे बोलतो तेच करतो, असे कृष्णा प्रकाश यांनी म्हटले आहे.

तानाजी पवार यांच्याकडून आमदार बनसोडे यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला होता. तानाजी पवार याने बनसोडे यांचे चिरंजीव सिद्धार्थ याच्यावर अपहरण आणि हत्येचा प्रयत्न केला होता. पवार यांनी सिद्धार्थ याने हल्ला केल्याचे म्हटले होते.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पिंपरी चिंचवड मधील आमदार आण्णा बनसोडे गोळीबारातून बचावले होते. त्यांच्यावर १२ मेला गोळीबार करण्यात आला होता. मात्र या घटनेत कोणालाही दुखापत झाली नाही. पोलिसांनी आरोपीना अटक केली आहे.

ताज्या बातम्या
HRCT स्कोर 21 असतानाही बेडही मिळेना; जवानानं आईवर शेतातच केले उपचार, असा दिला लढा

बॉलीवूडच्या ‘या’ कलाकारांनी कधीच केला नाही सावत्र आईचा स्वीकार; एक तर आईला म्हणाली चुडैल

‘इंडिअन आयडल १२ ची संभाव्य विजेती षण्मुख प्रिया आणि तिच्या आईने केला संताप व्यक्त; म्हणाली मायकल जाक्सनलाही…..

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.