लॉकडाऊनमध्ये घरीच करत होती ‘पोल डान्स’, नंतर अशी आपटली की व्हिडीओ पाहून पोट धरून हसाल

मुंबई | सोशल मीडियावर दररोज अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. यामध्ये काही गोष्टी करताना लोकांच्या झालेल्या फसगतीचे व्हिडीओ खुपच धक्कादायक आणि मनोरंजक वाटतात. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

व्हिडीओमध्ये महिला पोल डान्स करताना दिसून येत आहे. परंतु यादरम्यान तिची झालेली फजिती चर्चेचा विषय ठरली आहे. लॉकडाऊनच्या या काळात महिला तिच्या डान्सची आवड घरातच जपण्याचा प्रयत्न करत आहे. तिचा हा प्रयत्न तिच्या भलताच अंगलट आल्याचं दिसत आहे.

व्हिडीओत दिसत आहे त्याप्रमाणे महिला घरामध्येच असलेल्या पोलच्या आधारे डान्स करताना दिसते. ती डान्स करत पोलवर यशस्वीपणे चढते. पोलवर चढल्यानंतर ती डान्सच्या पुढच्या स्टेप्स करण्याचा प्रयत्न करते तोच अचानकपणे तिचा तोल जाऊ लागतो.

पोलवर चढल्यानंतर महिला पोलसहित घरात असलेल्या टेबलवर पडते. महिला टेबलवर पडल्याने टेबल मोडतो आणि त्यावरील वस्तू तिच्या अंगावर पडतात. यानंतर ती घरातील इतर सदस्यांना मदतीसाठी बोलावते.

अशाप्रकारे तिची फजिती झाल्याचा व्हिडीओ कॅमेऱ्यात कैद करण्यात आला आहे. सोशल मीडियावर नेटकऱ्यांचा या व्हिडीओला चांगला प्रतिसाद मिळत आहे. अनेकांना हा व्हिडीओ पाहून हसू आवरत नाही.

Hold My Beer या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ अपलोड करण्यात आला आहे. तो खूप व्हायरल होत आहे. या व्हिडीओला हजारो लाखो लोकांनी पाहिले आहे. तसेच यावर त्यांनी आपल्या भन्नाट कमेंट्स केल्या आहे.

महत्वाच्या बातम्या-
रश्मिका मंदानाने मारली पलटी, आधी म्हणाली विराट माझा फेवरेट, पण आता घेतलं दुसऱ्याचं नाव
अभिनेत्री नोरा फतेहीने पॅलेस्टाईनवरच्या अन्यायाविरोधात उठवला आवाज; चाहत्यांना केले ‘हे’ आवाहन
कलेक्टरने सोनू सूदच्या मदतीचा दावा फेटाळला, सोनूने थेट पुरावाच दाखवला

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.