स्पर्धेपुर्वी बाप गेला, भर स्पर्धेत फाॅर्मही हरपला; अखेर वादळ आलेच; मैदानातूनच बापाला केले नमन

आयपीएल २०२१ च्या २७ व्या सामन्यात मुंबई इंडियन्सने चेन्नई सुपर किंग्जचा रोमांचक सामन्यात ४ गडी राखून पराभव केला. पहिल्या डावात चेन्नई सुपर किंग्जने २० षटकांत २१८/४ अशी मोठी धावसंख्या उभारली होती.

त्या प्रत्युत्तराच्या पार्श्वभूमीवर मुंबई इंडियन्सने  शेवटच्या चेंडूवर सामना जिंकला. पोलार्डने ३४ चेंडूत ८७ धावा फटकावल्या. सामन्यात चेन्नई सुपर किंग्स विरोधात एकटा पोलार्ड उभा राहिला होता. असं  चित्र दिसत होतं.

संघाला विजय मिळवून दिल्यानंतर पोलार्ड भर मैदानात आकाशाकडे पाहत हात जोडून उभा राहिला. हात जोडून पोलार्ड वडिलांच्या आठवणीत भावूक झाला होता. कालच्या सामन्यातील कामगिरी त्याने वडिलांना समर्पित केली आहे. पोलार्डच्या वडीलांचं आयपीएल सुरू होण्याआधी निधन झालं होतं.

पोलार्डने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून वडीलांसोबतचा फोटो शेअर केला होता. त्यामध्ये त्याने म्हटलं होतं की, तुमच्यावरील प्रेम सदैव कायम राहिल. तुमच्या आत्म्याला शांती मिळो. तुम्ही चांगल्या ठिकाणी असाल माहित आहे. तुम्हाला अभिमान वाटेल अशी कामगिरी करत राहू.

चेन्नई सुपर किंग्स मुंबईचा पराभव करते का काय असं वाटत होतं. मात्र  पोलार्ड नावाचा वाघ मैदानात उतरला आणि त्याने चेन्नईला प्रत्येक चेंडूवर धुवायला सुरूवात केली. पोलार्डने प्रत्येक चेंडू मैदानाबाहेर लावण्यास सुरूवात केली

शेवटच्या षटकात विजयासाठी १६ धावा आवश्यक असताना पोलार्डने दोन चौकार व एक षटकार मारला. शेवटच्या चेंडूवर २ धावा काढत पोलार्डने मुंबईला विजयी केले. किरॉन पोलार्डने ३४ चेंडूत ८७ धावांचा शानदार डाव खेळला आणि शेवटच्या चेंडूवर संघाला दमदार विजय मिळवून दिला.

महत्वाच्या बातम्या-
मी अक्षयकुमारसारखी पैशांसाठी पगडी घालत नाही; पंजाबच्या स्टार क्रिकेटरचा अक्षयला टोला
पोलार्डच्या वादळात चेन्नईचा पालापाचोळा; २१९ धावांचा पाठलाग करत मुंबईकडून चेन्नईचा धुव्वा
क्रिकेटपटू ऋतूराज गायकवाडवर ‘या’ प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीचा लव्ह

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.