साधा साप म्हणून तरुणाने घेतला नागाशी पंगा, त्यानंतर पहा काय झालं; समोर आला भयानक व्हिडिओ

सोशल मीडियावर लाखो व्हिडिओ अपलोड होत असतात. पण त्यातले काहीच व्हिडिओ हे व्हायरल होत असतात. सोशल मीडियावर प्राण्यांचे व्हिडिओ खुप पसंत केले जातात. प्राण्यांचे काही व्हिडिओ हे खुप मजेदार असतात, तर काही थरकाप उडवणारे.

सापाचे अनेक भितीदायक व्हिडिओ समोर येत असतात. साप अचानक आपल्या समोर आपला चांगलाच गोंधळ उडतो. तर अनेक काही लोक हे सापासोबत मस्ती करताना दिसतात. सध्या नागपंचमीच्या दिवशीही अनेक सापाचे व्हिडिओ समोर आले होते.

काही दिवसांपुर्वी एक व्हिडिओ समोर आला होता, त्यामध्ये एका तरुणाने सापाची शेपुट पकडून त्याला हवेत गरगर फिरवून फेकले होते. या कृत्यावर अनेकांनी आक्षेप घेतला होता. पण कधी कधी सापांशी पंगा घेणे जीवावर बेतल्याच्या घटनाही घडत असतात.

आता एक असाच थरकाप उडवणारा सापाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एक तरुण सापाशी पंगा घेताना दिसून येत आहे. पण असं करण त्याला जीवावरही बेतलं असतं.

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एक तरुण सापाची शेपूट पकडून त्याला पकडण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी साप हा दरवाज्या आत असल्यामुळे त्याला सापाच्या ताकदीचा अंदाजा नव्हता आला.

व्हिडिओमध्ये दिसते की एक तरुण घरात घुसणाऱ्या सापाची शेपूट पकडताना दिसतो. तो तरुण त्याची शेपूट पकडतो, तेव्हा त्याला सापाच्या अंदाज आलेला नसतो. त्यामुळे त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न करतो, त्यानंतर जसा तो साप बाहेर येतो, तेव्हा त्याला धक्काच बसतो.

खरंतर त्या तरुणाला वाटत असचं की तो साप छोटा आहे. पण जेव्हा तो बाहेर येतो तेव्हा त्याला दिसते कि तो तर एक मोठा नाग आहे. त्यावेळी तरुण प्रचंड घाबरुन जातो आणि तिथून पळ काढतो. सध्या हा भयानक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

महत्वाच्या बातम्या-

ठाकरे सरकारला मोहरमची गर्दी चालते पण गणेशोत्सावासाठी लोक निघाले की लगेच यांचा कोरोना निघतो- नितेश राणे
इंग्लड विरुद्धच्या कसोटी सामन्यात भारताच्या ‘या’ चार खेळाडूंनी केले जबरदस्त प्रदर्शन; त्यांच्यामुळेच इंग्लंडचा झाला पराभव
‘घरगुती गॅसबाबत सरकारचा नवा नियम; जर तुमच्याकडे ‘हे’ नसेल तर तुम्हाला गॅस मिळणार नाही’

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.