धक्कादायक! पुण्यात कोरोना आवाक्याबाहेर, पुणे महानगरपालिकेची लष्कराकडे मदतीची हाक

 

 

पुण्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे, त्यामुळे पुण्यात बेड आणि व्हेंटिलेटरची संख्या कमी पडत चालली आहे. असे असताना कोरोनाचा प्रादुर्भावामुळे पुण्याची परिस्थिती आवाक्याबाहेर जाताना दिसून येत आहे. त्यामुळे आता महानगरपालिकेने लष्कराकडे मदत मागितली आहे.

पुणे महानगरपालिकेच्या हद्दीत कोरोना रुग्णांवर उपाचार करण्यासाठी पुण्यात जवळपास २१ हजार पेक्षाजास्त बेड उपलब्ध करण्यात आले आहे. पण यातील बहुतांश बेडला व्हेंटिलेटरच नाही.

पुण्यात आता असलेल्या बेडपैकी ४८९ बेडला व्हेंटिलेटर आहे. सोमवारी संध्याकाळी तर एकही व्हेंटिलेटरवर बेड उपलब्ध नसल्याचे समोर आले. त्यानंतर मंगळवारी रात्री उशिरा बेड उपलब्ध झाले होते.

पुण्यामध्ये कोरोनाची स्थिती आवाक्याबाहेर जाताना दिसत आहे. त्यामुळे आता पुणे महानगरपालिकेने भारतीय लष्कराकडे मागितली आहे. पुण्यात भारतीय लष्कराचे मोठे रुग्णालय आहे. त्या रुग्णालयात ३३५ बेड आहेत, तर १५ व्हेंटिलेटर आहे.

आता या लष्करी रुग्णालयात कोरोना रुग्णांना उपचार देण्यात यावे, अशी मदतची हाक पुणे महानगरपालिकेने मारली आहे. पण याबाबत अजून कुठलीही अधिकृत माहिती लष्करी रुग्णालयाकडुन समोर आलेली नाही.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.