पंतप्रधान कार्यालय कामाचे नाही, कोरोना लढ्याचे नेतृत्व गडकरींकडे द्या; भाजपा खासदाराची मागणी

नवी दिल्ली । सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अनेकांना जीव गमवावा लागत आहे. आरोग्य व्यवस्थेवर मोठा ताण आल्यामुळे ऑक्सिजन, बेड, व्हेंटिलेटर देखील उपलब्ध होत नाहीत. असे असताना केंद्र सरकारवर विरोधक टीका करत आहेत. असे असताना भाजप खासदार देखील आता मोदींवर टीका करू लागले आहेत.

भाजपाचे राज्यसभा खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी केंद्राला घरचा आहेर दिला आहे. पंतप्रधान कार्यालय कोरोना माहमारीच्या काळामध्ये काहीच काम करत नसून सध्याची परिस्थिती हातळ्याची सर्व जबाबदारी नरेंद्र मोदींनी त्यांचे सहकारी असणाऱ्या नितीन गडकरी यांच्याकडे द्यावी, अशी मागणी स्वामी यांनी केली.

यामुळे आता भाजप खासदारांनी केलेल्या या मागणीमुळे चर्चा सुरू झाली आहे. तसेच आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन हे खूपच नम्र असून त्यांना त्यांच्या खात्याचे काम मोकळेपणाने करु दिले जात नसल्याचे म्हटले आहे.

गडकरींकडे सर्व कारभार द्यावा, या स्वामींच्या मागणीला अनेकांनी समर्थन दिले आहे. हा पर्याय अगदी योग्य असल्याचे म्हटले आहे. भाजपमध्ये गडकरी यांच्या वेगळा गट मानला जातो.

पंतप्रधान कार्यालय म्हणजे पंतप्रधान नाहीत हे लक्षात घ्यावे, असेही स्वामींनी म्हटले आहे. स्वामी यांच्या या ट्विटवर सध्याचे आरोग्यमंत्री असणाऱ्या हर्षवर्धन यांना पदावरुन काढून टाकण्याची मागणी केली त्यावरही स्वामींनी उत्तर दिले आहे.

ते म्हणाले, नाही, हर्षवर्धन यांना मोकळेपणे काम करु दिले जात नाही. ते खूपच नम्र आहेत. गडकरींच्या सोबत काम केल्याने त्यांच्यातील हा गुण नक्कीच बहरेल, अशी अपेक्षा स्वामींनी व्यक्त केली आहे.

मात्र स्वामींनी केलेली ही मागणी एकप्रकारे मोदींवर टीकाच समजली जात आहे. अनेकदा गडकरी यांचे नाव पंतप्रधान पदासाठी घेतले जात असताना त्यांना बाजूला करण्यात आले आहे.

ताज्या बातम्या

सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर संभाजीराजेंनी सुचवला ‘हा’ नामी उपाय

कोणताही खास व्यायाम न करता ‘ही’ साधी ट्रीक वापरून महिलेने कमी केले तब्ब्ल १९ किलो वजन

जगातील ५ असे घटस्फोट जिथं पत्नी वेगळी झाल्यानंतर बनली अब्जाधिश आणि नवरा झाला थोडा गरीब

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.