तुझ्यामध्ये भारताचा आत्मा दिसून येतो; मोदींकडून धोनीचं तोंडभरुन कौतुक

नवी दिल्ली | भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्र सिंग धोनी याने 15 ऑगस्ट रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी धोनी याला पत्र लिहिलंय. या पत्रामध्ये पंतप्रधान मोदींनी धोनीचं तोंडभरुन कौतुक केलं आहे.

एका सैनिकाला, खेळाडूला तसंच कलाकाराला कौतुक हवं असतं. त्यांची इच्छा असते की त्यांच्या कार्याची आणि मेहनतीची दखल घ्यावी. तुम्ही केलेल्या कौतुकाबद्दल मी आभारी आहे, असं म्हणत धोनीने हे पत्र ट्विट करत नरेंद्र मोदींचे आभार मानलेत.

तुझ्यामध्ये भारताचा आत्मा दिसून येतो. 15 ऑगस्टला तू अतिशय साधेपणाने व्हिडीओ शेअर करत निवृत्ती जाहीर केलीस. मात्र 130 कोटी भारतीय तुझ्या निर्णयाने नाखूश झाले. तू भारतीय टीमच्या यशस्वी कर्णधारांपैकी एक आहेस, असं म्हणत नरेंद्र मोदींनी माहीचं तोंडभरुन कौतुक केलं आहे.

सर्वश्रेष्ठ फलंदाज, कर्णधार यांच्यात तुझ्या नावाचा समावेश होतो. मात्र गेले 15 वर्ष जे भारतासाठी केलंय त्यासाठी आम्ही सर्व आभारी आहोत, असंही मोदी पत्रात म्हणाले आहेत.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.