Share

ज्याला वाटत असेल चित्रपट चांगला नाही त्याने..’, द काश्मिर फाईल्सचा विरोध करणाऱ्यांवर बरसले मोदी

narendra-modi-

सध्या ‘द कश्मीर फाइल्स’ या चित्रपटाची सर्वत्र चर्चा होत आहे. बॉक्स ऑफिसवर देखील या चित्रपटाने धुमाकूळ घातला आहे. तसेच या चित्रपटाला प्रेक्षकांची आणि समीक्षकांची देखील मोठी पसंती मिळत आहे. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील या चित्रपटाचे कौतुक करत विरोधकांवर जोरदार निशाणा साधला आहे.(pm narendra modi statement on the kashmir files film)

आज भाजपच्या संसदीय मंडळाची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत विविध मुद्यांवर चर्चा झाली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटाचा उल्लेख केला. “या चित्रपटामुळे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा झेंडा घेऊन मिरवणाऱ्यांना धक्का बसला आहे”, अशी टीका पंतप्रधान मोदींनी विरोधकांवर केली आहे.

यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले की, “द कश्मीर फाइल्ससारखे सिनेमे बनायला हवेत. असा सिनेमातून सत्य जनतेसमोर येत असते. गेल्या अनेक दशकांपासून जे सत्य लपवण्याचा प्रयत्न झाला त्याला समोर आणलं जात आहे. त्यामुळे जे लोक सत्य लपवण्याचा प्रयत्न करतायेत ते आज विरोध करत आहेत, असा टोला पंतप्रधान मोदींनी नाव न घेता काँग्रेसला लगावला आहे.

पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले की, “महात्मा गांधींच्या जीवनावर चित्रपट बनवून तो जगासमोर ठेवण्यासाठी त्यावेळी जर कोणी धैर्याने काम केले असते तर आपण संदेश देऊ शकलो असतो. पहिल्यांदाच एका परदेशी व्यक्तीने गांधी चित्रपट बनवला आणि त्याला ऑस्कर मिळाला तेव्हा जगाला कळले की गांधी किती महान व्यक्ती आहेत.”

“घराणेशाहीचा हा लोकशाहीला धोका आहे. त्याविरोधात लढावे लागेल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बैठकीत सांगितले. घराणेशाहीच्या विरोधात आपण इतर पक्षांविरुद्ध युद्ध पुकारत असेल तर त्याचा विचार आपल्या पक्षातही करायला हवा”, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले आहेत. या बैठकीला भाजपचे दिग्गज नेते उपस्थित होते.

‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपटाबाबत बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, “हा चित्रपट चांगला नाही असे ज्याला वाटत असेल त्याने आपला दुसरा चित्रपट तयार करावा. पण मला आश्चर्य वाटते, जे सत्य इतके दिवस दडपून ठेवले गेले, ते वस्तुस्थितीच्या आधारे बाहेर आणले जात आहे. ते कोणीतरी मेहनतीने आणत आहे. अशा परिस्थितीत सत्यासाठी झगडणाऱ्यांची जबाबदारी आहे की त्यांनी सत्याच्या बाजूने उभे राहिले पाहिजे.”

महत्वाच्या बातम्या :-
हनिमूनच्या रात्री पत्नीने केले भयानक कृत्य, घाबरलेल्या नवऱ्याने गाठले पोलीस स्टेशन; वाचा नेमकं काय घडलं
‘द काश्मीर फाइल्स’मुळे कायदा-सुव्यवस्था धोक्यात आणायचा प्रयत्न; दिलीप-वळसे पाटलांनी व्यक्त केली चिंता
मेट्रोच्या भोसरी स्टेशनचे नाव बदलण्याची पुणेकरांची मागणी; जाणून घ्या यामागचे हैराण करणारे कारण

ताज्या बातम्या राजकारण

Join WhatsApp

Join Now