Share

‘माझ्या आजोबांचं, बाबांचं रक्त सांडलंय इथं; असं म्हणणाऱ्या राहुल गांधींवर मोदींचा हल्लाबोल, म्हणाले…

modi-rahul-gandhi-2

२ फेब्रुवारीला लोकसभेत काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी(Rahul Gandhi) यांनी भाषण केलं होतं. या भाषणात राहुल गांधी यांनी भाजप(BJP) सरकारवर आणि आरएसएसवर निशाणा साधला होता. “माझ्या आजोबांचं, बाबांचं रक्त सांडलंय इथं”, असं म्हणत त्यांनी भाजप देशाला विभागण्याचं काम करत असल्याची टीका केली होती.(PM narendra modi statement on rahul gandhi)

राहुल गांधी यांच्या विधानाला पंतप्रधान मोदींनी(PM Modi) लोकसभेत धन्यवाद प्रस्ताव सादर करत असताना प्रत्युतर दिल आहे. पंतप्रधान मोदींनी तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरू यांच्या वक्तव्याचा दाखल देत राहुल गांधी यांचे मुद्दे खोडून काढले आहेत. पंतप्रधान मोदींनी ७ फेब्रुवारीला लोकसभेत केलेल्या भाषणात काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांना सुनावलं आहे.

राहुल गांधी यांच्या वक्तव्याला उत्तर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, “काँग्रेस आज तुकडे-तुकडे टोळीचा नेता बनली आहे. ‘भारत हे राष्ट्र नाही’ असे राहुल गांधी म्हणाले होते. काँग्रेस पक्ष हा फुटीरतावादी राजकारण करत आहे”, असा आरोप पंतप्रधान मोदींनी केला आहे. “काँग्रेसला आता सत्ता मिळणार नाही हे कळून चुकले आहे, त्यामुळे ते आता शक्य तितके सरकारला अस्थिर करण्याचा प्रयत्न करत आहेत”, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

राहुलचे नाव न घेता पंतप्रधान मोदी म्हणाले की, “सभागृहात तामिळ भावना भडकावण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. इतिहासात ज्यांना भारताचे नुकसान करायचे होते त्यांनी काहीतरी गमावले आहे. पण त्यांना माहित असायला हवे की भारत अमर आहे आणि अमर राहील, असा इशारा मोदींनी राहुल गांधीना दिला.

पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले की, “भारतीयांच्या वैशिष्ट्यांचे वर्णन करताना आम्ही या अवतरणातील दोन शब्द लक्षात घेणार आहोत – राष्ट्रीय वारसा. हे वाक्य पंडित नेहरूंचं आहे. हे वाक्य पंडित नेहरूंनी त्यांच्या ‘खोज ऑफ इंडिया’ या पुस्तकात म्हटले आहे. आपला राष्ट्रीय वारसा एक आहे, आपली नैतिक आणि मानसिक वैशिष्ट्ये एक आहेत.”

“काँग्रेसच्या रक्तात फुटीरतावादी मानसिकता घुसली आहे. इंग्रज निघून गेले, पण फूट पाडा आणि राज्य करा हे धोरण काँग्रेसने आपले चारित्र्य बनवले आहे. त्यामुळेच आज काँग्रेस तुकडे तुकडे टोळीचा नेता झाला आहे”, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेस पक्षावर केली. पंतप्रधान मोदींनी केलेल्या टीकेनंतर राहुल गांधी यांच्याकडून कोणती प्रतिक्रिया येते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

महत्वाच्या बातम्या :-
“ ज्यांनी तुम्हाला मुख्यमंत्री केले, त्याच काँग्रेसच्या पाठीत तुम्ही खंजीर खुपसला होता विसरलात का?”
नोरा फतेहीचे इन्स्टाग्राम अकाऊंट झाले होते डिलीट, शेवटच्या पोस्टमध्ये लिहीली होती ‘ही’ गोष्ट
शाहरुख खानने लता मंगेशकरांच्या पार्थिवावर मारलेल्या फुंकरमुळे आर्यन संतापला; केले असे काही की..

राजकारण

Join WhatsApp

Join Now