रविवारी भारतरत्न गायिका आणि स्वरकोकिळा लता मंगेशकर यांचे निधन झाले. मुंबईतील(Mumbai) शिवाजी पार्क येथे भारतरत्न गायिका लता मंगेशकर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. दिग्गज गायिका लता मंगेशकर यांच्या अंत्यदर्शनासाठी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील उपस्थित होते.(pm narendra modi meet mns leader raj thakare)
यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी(Narendra Modi) यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे(Raj Thakare) यांची भेट घेतली. भारतरत्न गायिका लता मंगेशकर यांना आदरांजली वाहण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी मुंबईत आले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबईतील शिवाजी पार्क येथे जाऊन दिग्गज गायिका लता मंगेशकर यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले आणि त्यांना श्रद्धांजली वाहिली.
भारतरत्न गायिका लता मंगेशकर यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेण्यासाठी राजकीय आणि चित्रपट क्षेत्रातील नामवंत व्यक्ती हजर होते. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गायिका लता मंगेशकर यांच्या कुटूंबियांची भेट घेतली. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक पक्षाच्या राजकीय नेत्यांशी चर्चा केली.
कैसे हो राज…#MNS pic.twitter.com/EP2qX5Pd5X
— Shalini Thackeray (@ThakareShalini) February 7, 2022
यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या खांद्यावर हाथ ठेवला आणि “कसा आहेस राज?”, अशा शब्दांत त्यांची विचारपूस केली. मनसे पक्षाच्या सरचिटणीस शालिनी ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीचा हा व्हिडिओ सोशल मिडीयावर शेअर केला आहे.
यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची देखील भेट घेतली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी पंतप्रधान मोदींना हात जोडून नमस्कार केला. पंतप्रधान मोदींनीही याला प्रतिसाद देत आपले हात जोडले. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार देखील त्या ठिकाणी उपस्थित होते.
गेल्या सात दशकांहून अधिक काळ जगभरातील अगणित संगीतप्रेमींना लता मंगेशकर यांनी गाण्याच्या माध्यमातून समृद्ध केलं. लतादीदींच्या निधनामुळे संगीत व सांस्कृतिक विश्वावर शोककळा पसरली आहे. भारतरत्न दिग्गज गायिका लता मंगेशकर यांच्या निधनामुळे संगीत क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
महत्वाच्या बातम्या :-
शिवाजी पार्कवर लतादिदींचे स्मारक उभारण्याची भाजपची मागणी; ‘या’ पक्षांनी केला विरोध
‘भांडून लता दीदींचं अंत्यदर्शन घेतलं’; अभिनेत्रीची पोस्ट तूफान व्हायरल, वाचा नेमकं काय घडलं?
मी तीन वेळा तयार झालो होतो पण.., धर्मेंद्र यांनी सांगितले लता दीदींच्या अंत्यसंस्काराला न येण्याचे कारण