Share

बाबो! मोदींच्या एका तासाच्या विमान प्रवासासाठी खर्च होतात ‘इतके’ कोटी रुपये, वाचून थक्क व्हाल

Modi-air-plane

पंतप्रधान नरेंद्र मोदी(PM Narendra Modi) हे जगातील सर्वात लोकप्रिय नेत्यांपैकी एक आहेत. पंतप्रधान मोदींची कार, त्यांचे विमान आणि मोदींचे जॅकेट या गोष्टींची नेहमीच चर्चा होत असते. पंतप्रधान मोदी १३८ कोटी भारतीयांचे प्रतिनिधित्व करतात. त्यामुळे पंतप्रधान मोदींच्या सुरक्षेसाठी भारत सरकारकडून प्रचंड खर्च केला जातो. पंतप्रधानांना हवाई प्रवासासाठी विशेष विमान वापरले जाते.(pm narendra modi 1 hour air travel expense)

या विमानाच्या हवाई प्रवासाचा खर्च ऐकला तर तुम्हाला मोठा धक्का बसेल. भारतीय पंतप्रधानांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने अत्याधुनिक असं विमान बनवण्यात आलं आहे. या विमानामध्ये अनेक वैशिष्ट्ये आहेत. भारताचे राष्ट्रपती(President), पंतप्रधान आणि उपराष्ट्रपती(Vice President) यांसारख्या व्हीआयपी लोकांसाठी ‘एअर इंडिया वन’ हे विमान ऑक्टोबर २०२० मध्ये भारतात आणण्यात आले होते.

हे जगातील सर्वात सुरक्षित विमान आहे. हे विमान कठीण काळात शत्रूंवर हल्ला देखील करू शकते. या विमानामध्ये असलेले तंत्रज्ञान कोणत्याही प्रकारच्या हवाई हल्ल्याला तोंड देऊ शकते. ‘एअर इंडिया वन’ मधून पंतप्रधान मोदी प्रवास करतात. या विमानाचा ताशी वेग ९०० किलोमीटर आहे. या विमानाची किंमत सुमारे ४२२९ कोटी आहे.

या विमानामध्ये सुरक्षेसाठी सुमारे ५०० कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, एअर इंडिया वन विमान १७ तास न थांबता हवेत उडू शकते. या विमानात हवेत इंधन भरण्याची सोय आहे, ज्यामुळे त्याला जमिनीवर उतरण्याची गरज भासत नाही. हे विमान अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या ‘एअर फोर्स वन’च्या धर्तीवर इन्फ्रारेड काउंटरमेजर (LAIRCM) तंत्रज्ञानावर काम करते.

यामुळेच या विमानाला क्षेपणास्त्रेही इजा करू शकत नाहीत. या विमानाची प्रगत संपर्क यंत्रणा कोणीही हॅक करू शकत नाही. यामध्ये मध्य हवेत ऑडिओ आणि व्हिडिओ कम्युनिकेशन करता येते. यात अप्रोच वॉर्निंग सिस्टीम आहे, ज्यामुळे विमानाचा पायलट कठीण काळात क्षेपणास्त्रांवर हल्ला करू शकतो. या विमानाचे इलेक्ट्रॉनिक युद्ध जॅमर शत्रूचे जीपीएस आणि ड्रोन सिग्नल ब्लॉक करू शकतात.

या विमानात डायरेक्शनल इन्फ्रारेड काउंटरमेजर सिस्टीम आहे, जे क्षेपणास्त्र आणि इन्फ्रारेड क्षेपणास्त्रांपासून विमानाचे संरक्षण करते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या एका तासाच्या विमान प्रवासासाठी १ कोटी ३६ लाख रुपये इतका खर्च येतो. ‘एअर इंडिया वन’ या विमानाची निर्मिती ‘एअरफोर्स वन’ च्या धर्तीवर करण्यात आली आहे.

महत्वाच्या बातम्या :-
श्रेयस अय्यर झाला मालामाल, केकेआरने खरेदी केले १२.२५ कोटींमध्ये; डोक्यावर सजणार कर्णधारपदाचा मुकूट
”तुम्ही राजीव गांधींचे पुत्र आहात की नाही याचा पुरावा आम्ही कधी मागितला का?”
पोलिस मामाच झाले चोर! ठाण्यातील डिझेल चोरताना पोलिसाला रंगेहाथ पकडले, असा आखला होता प्लॅन

इतर

Join WhatsApp

Join Now