पंजाबातील शेतकऱ्यांना गोंजारण्याचा मोदींचा प्रयत्न; आता म्हणतात..

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ‘मन की बात’ च्या माध्यमातून देशाला संबोधित केले. मन की बात ची ही ७१ वी आवृत्ती होती. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील कोरोनाच्या परिस्थितीविषयी, शेतकरी कायद्याविषयी आपले मत मांडले. पीएम मोदी यांनी नव्या कायद्याबद्दल सांगताना शेतकऱ्यांचे मन वळवण्याचा प्रयत्न केला आहे.

मोदी म्हणाले, “भारतात शेतीशी संबंधित गोष्टीसोबत नवे आयाम जोडले गेले आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये झालेल्या कृषी कायद्यांधील सुधारणांमुळे शेतकऱ्यांसाठी नव्या संधींचे दरवाजे उघडले गेले आहेत. या हक्कांनी अतिशय कमी कालावधीत शेतकऱ्यांच्या समस्या कमी करण्यास सुरुवात केली आहे.”

तसेच “बराच विचार केल्यानंतर भारताच्या संसदेने कृषी सुधारणांना कायद्याचे स्वरुप दिले. या सुधारणांमुळे केवळ शेतकऱ्यांची बंधनेच नष्ट झालेली नाहीत, तर त्यांना नवे हक्क देखील मिळालेत, नव्या संधी देखील उपलब्ध झाल्या आहेत”. असे मोदी म्हणाले.

मोदींनी यावेळी महाराष्ट्रातील जितेंद्र भोइजी या शेतकऱ्याचा उल्लेख केला. “जितेंद्र यांनी नव्या कायद्याचा फायदा उचलत आपली थकबाकी वसूल केल्याचे मोदींनी सांगितले. ”नव्या कायद्याअंतर्गत संबंधित क्षेत्रातील एसडीएमला केवळ एका महिन्यात शेतकऱ्याच्या तक्रारीचे निवारण करणे बंधनकारक करण्यात आले आहे.”

” त्यामुळे अशा फायदेशीर कायद्याची ताकद हाती असल्यामुळे जितेंद्र यांची अडचण दूर झाली. त्यांनी तक्रारीची नोंद केली आणि अवघ्या काही दिवसांत त्यांना थकबाकी मिळाली”, असं मोदी म्हणाले.

…त्यावेळी रतन टाटा स्वत: तीन दिवस तीन रात्र ताज बाहेरच्या फुटपाथवरच थांबून होते

रागारागात धरम पाजीला मारायला सेटवर गेला होता संजय दत्त; पण धर्मेंद्रने मात्र…

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.