Share

PM Modi On Delhi Blast : ‘षडयंत्र रचणाऱ्यांना सोडले जाणार नाही; घटनेच्या मुळाशी जाणार…’, दिल्लीतील स्फोटावर भूतानहून पंतप्रधान मोदींचा कडक इशारा

PM Modi On Delhi Blast : देशाची राजधानी दिल्ली (Delhi) काल म्हणजेच १० नोव्हेंबर रोजी झालेल्या भीषण स्फोटाने हादरून गेली. ऐतिहासिक लाल किल्ला (Red Fort) परिसरातील मेट्रो स्टेशनच्या गेट क्रमांक १ जवळ पार्क केलेल्या कारमध्ये झालेल्या या स्फोटात नऊ जणांचा मृत्यू झाला, तर २४ जण जखमी झाले आहेत. या घटनेनंतर दिल्ली पोलिस (Delhi Police), एनएसजी (NSG) आणि इतर सुरक्षा यंत्रणा उच्च सतर्कतेवर आहेत.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) हे दोन दिवसांच्या भूतान (Bhutan) दौऱ्यावर असून, तेथूनच त्यांनी या घटनेबद्दल कठोर प्रतिक्रिया दिली. त्यांनी स्पष्ट इशारा दिला की, “या षड्यंत्रामागे जे कोणी आहेत, त्यांना सोडलं जाणार नाही. सर्व एजन्सी घटनेच्या मुळाशी जाऊन दोषींना शिक्षा देतील.”

पंतप्रधान मोदींचा भावनिक प्रतिसाद

भूतान दौऱ्यावर असताना मोदी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, “मी अत्यंत दुःखी मनाने येथे आलो आहे. दिल्लीतील स्फोटाने संपूर्ण देश हादरला आहे. मी रात्रीभर तपास यंत्रणांशी संपर्कात होतो आणि आवश्यक ती निर्देशना दिली आहे.” त्यांनी मृतांच्या कुटुंबीयांप्रती संवेदना व्यक्त केल्या आणि जखमींच्या लवकर बरे होण्याची प्रार्थना केली. तसेच सुरक्षा यंत्रणांना तातडीने आणि निष्पक्ष तपास करण्याचे आदेश दिले.

भूतान दौऱ्याचा उद्देश आणि कार्यक्रम

या दौऱ्यादरम्यान मोदी आणि राजा जिग्मे खेसर नामग्याल वांगचुक यांच्या उपस्थितीत 1,020 मेगावॅट क्षमतेच्या पुनात्सांगचू-IImजलविद्युत प्रकल्पाचं उद्घाटन करण्यात येणार आहे.मोदी भूतानला 1,000 कोटी रुपयांची आर्थिक मदत जाहीर करतील. तसेच भूतानचे चौथे राजे जिग्मे सिंग्ये वांगचुक यांच्या ७० व्या वाढदिवसाच्या सोहळ्यालाही उपस्थित राहणार आहेत.

या व्यतिरिक्त मोदी जागतिक शांती प्रार्थना महोत्सवात सहभागी होऊन भगवान बुद्धांच्या पवित्र अवशेषांना दर्शन देतील. पुढील दिवशी ते भूतानचे पंतप्रधान त्शेरिंग तोबगे (Tshering Tobgay) यांची भेट घेऊन ऊर्जा, वाहतूक आणि विकास प्रकल्पांवरील सहकार्याबाबत चर्चा करतील.

विरोधकांचा आरोप

या घटनेनंतर विरोधकांनी मोदींवर टीका केली आहे. दिल्ली हादरलेली असताना त्यांनी दौरा रद्द न करता भूतानला जाणं योग्य होतं का, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. मात्र पंतप्रधान कार्यालयानं (PMO) स्पष्ट केलं की, सुरक्षा आणि तपास यंत्रणा पूर्ण क्षमतेने काम करत आहेत आणि दोषींना लवकरच गजाआड केलं जाईल.

 

ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now