कोरोना रात्रीचाच बाहेर पडतो का? नाईट कर्फ्युबाबत नरेंद्र मोदींनी समजावले..

देशात कोरोना झपाट्याने पसरत आहे त्यामुळे अनेक राज्यांनी रात्रीच्या कर्फ्युची अंमलबजावणी केली आहे. यावरून देशातील अनेक लोकांनी ट्रोलिंग करण्यास सुरूवात केली आहे. त्यांनी असा सवाल उपस्थित केला आहे की कोरोना रात्रीचाच बाहेर पडतो का? याला पंतप्रधान मोदींनी उत्तर दिले आहे.

महाराष्ट्र, पंजाब, लखनऊ, नोएडा, गाझियाबादसह अनेक शहरांत रात्रीची संचारबंदी करण्यात आली आहे. आणि अनेक निर्बंध लादण्यात आले आहेत. आता यावर नरेंद्र मोदींनी उत्तर दिले आहे. ते म्हणाले आहेत की कोरोना रूग्णांची संख्या वाढली तर चालेल पण कोरोना चाचण्या वाढवा असे आदेश दिले आहेत.

तसेच नाईट कर्फ्युला कोरोना कर्फ्युचे नाव दिल्याने लोकांमध्ये कोरोनाविषयी जागरूकता निर्माण होईल आणि ते आणखी काळजी घेतील. तसेच जगभराने नाईट कर्फ्युचा स्वीकार केला आहे असेही ते म्हणाले. आता जरी नाईट कर्फ्यु असला तरी त्याला लोकांना कोरोना कर्फ्यु म्हणून लक्षात ठेवायला हवे.

काहींना प्रश्न विचारला आहे की कोरोना रात्रीचाच येतो का? जगाने हा कर्फ्यु स्विकारला आहे. कारण प्रत्येकाला कर्फ्यु काळात विचार येतो आपण कोरोनाकाळात जगतोय. आपण रात्री ९ ते सकाळी ५ या काळात नाईट कर्फ्यु केल्याने चांगले होईल. यामुळे अन्य व्यवस्था प्रभावित होणार नाहीत.

देशातील सर्व राज्यात कोरोना वाढण्याचे कारणही पंतप्रधान मोदींनी सांगितले आहे. आपण कोरोना लसीकरणाच्या नादात कोरोना चाचण्यांकडे दुर्लक्ष केले आहे त्यामुळे कोरोना रूग्णांची संख्या वाढली आहे. तसेच येत्या ११ ते १४ एप्रिल दरम्यान कोरोना लसीकरण उत्सव साजरा करण्यात येईल असेही मोदी म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या
कोब्रा कमांडो राकेश्वर यांची १०० तासांनी सुटका कशी झाली? वाचा इनसाईड स्टोरी
एकाचवेळी ४२ कोरोना रुग्णांवर अंत्यसंस्कार, अहमदनगरमधील मन सुन्न करणारी घटना
सचिन वाझेला पुढची भाजपची खासदारकी पक्की; अमोल मिटकरींनी केले ‘हे’ प्रश्न उपस्थित
पैशांची कमी नाही तरी या गावातील लोक कपडेच घालत नाहीत, पर्यटकांनाही कपडे काढूनच जावे लागते

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.