प्रधानमंत्री किसान योजनेशी जोडली किसान क्रेडिट कार्ड योजना, शेतकऱ्यांना जबरदस्त फायदा

भारत सरकारने आता शेतकर्‍यांना शेतीसाठी कर्ज घेणे सोपे केले आहे. शेतकऱ्यांसाठी केसीसी (किसान क्रेडिट कार्ड) ही योजना प्रधानमंत्री किसान सम्मान निधी योजनेशी जोडली आहे. दोन्ही योजना एकत्रित करून सरकारने केसीसी (किसान क्रेडिट कार्ड) तयार करण्याची मोहीमदेखील सुरू केली आहे.

केंद्राच्या योजनेअंतर्गत आतापर्यंत १ कोटीहून अधिक अर्जांना मंजुरी मिळाली आहे. या अर्जांवर आतापर्यंत १,६३,६२७ कोटी रुपयांची कर्ज देण्यात आली आहेत. अशी माहिती केंद्र सरकारने दिली आहे.

किसान क्रेडिट कार्डवरील व्याज दर

किसान क्रेडिट कार्डवर इतर क्रेडिट कार्डच्या तुलनेत फारच कमी व्याज असतो. केसीसी अंतर्गत ३ लाख रुपयांपर्यंतची कर्ज फक्त ७% व्याजदराने उपलब्ध आहेत. जर शेतकरी कर्जाचे पैसे वेळेत परत करत असेल तर ३ टक्क्यांपर्यंत सूटदेखील मिळते अशा प्रकारे प्रामाणिक शेतकर्‍यांना केवळ ४% व्याज दराने पैसे मिळतात.

केंद्र सरकारने २०२१-२२ च्या अर्थसंल्पात १६.५ लाख कोटी रुपयांच्या कृषी कर्जाचे वितरण करण्याचे लक्ष ठेवले आहे. जेणेकरुन शेतक्यांना सहज कर्ज मिळू शकेल. डेअरी आणि मत्स्यव्यवसायातील शेतकऱ्यांना कर्जाची उपलब्धता सुलभ केली गेली आहे. सद्यस्थितीत ८.५ कोटी किसान क्रेडिट कार्ड धारक आहेत. तर पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचे ११ कोटी लाभार्थी आहेत.

किसान क्रेडिट कार्ड(KCC) कसे तयार केले जाऊ शकते? जाणून घ्या

किसान क्रेडिट कार्ड मिळविण्यासाठी आपल्याकडे अनेक पर्याय आहेत. अधिकृत वेबसाइट PMkisan.gov.in वर संपुर्ण महिती उपलब्ध आहे. यासाठी पुढील कागदपत्रांची अवश्यकता आहे. महसूल रेकॉर्ड, आधार कार्ड, पॅन कार्ड, फोटो अर्जदाराची कोणत्याही बॅंकेत थकबाकी नसल्याचे प्रतिज्ञापत्र सादर करावे लागेल. तेसच बॅंका केसीसी बनवण्याची प्रक्रिया निशुल्क करणार आहेत.

महत्वाच्या बातम्या-
शेतकरी आंदोलन! ‘अनेक नेते भाजपा सोडण्याच्या तयारीत’; एका ट्विटने राजकीय वर्तुळात उडाली खळबळ
फिक्सिंगमध्ये सापडलेला ‘हा’ खेळाडू पुन्हा खेळणार IPL; स्वत: BCCI नेच केली घोषणा
राष्ट्रीय पुरस्कार मिळत नसल्याने गायक कुमार सानुंनी व्यक्त केली खंत, म्हणाले…
..त्यामुळे “मला भारतरत्न देण्याच्या मागणीची मोहीम थांबवा’’ रतन टाटांचे भावनिक अवाहन

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.