Share

PM Kisan : पीएम किसानच्या लिस्टमधून राज्यातील तब्बल अडीच लाख शेतकऱ्यांना वगळलं, 21 व्या हप्त्याचे 2000 तुमच्या खात्यात येणार का? नाव यादीत कसं पाहाल?

PM Kisan : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी (Narendra Modi – PM India) यांच्या हस्ते पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा 21 वा हप्ता लवकरच देशभरातील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जाणार आहे. या टप्प्यात जवळपास 18000 कोटी रुपये थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यांमध्ये जाणार असून, काही दिवसांपूर्वी अतिवृष्टीचा फटका बसलेल्या पंजाब(Punjab – North State), हिमाचल, उत्तराखंड आणि जम्मू-काश्मीर या राज्यांतील शेतकऱ्यांना आधीच रक्कम वितरित करण्यात आली आहे.

दरम्यान, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी मात्र एक चिंताजनक अपडेट समोर आलं आहे. नव्या तपासणीनुसार, आधार क्रमांक, उत्पन्नकर माहिती आणि शिधापत्रिका तपशीलांच्या आधारे पात्रता पुन्हा पडताळताना राज्यातील तब्बल अडीच लाख शेतकरी यादीतून काढण्यात आले आहेत. त्यामुळे अनेकांना आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न पडला आहे की, आपल्याला 21 व्या हप्त्याचे 2000 रुपये मिळणार का? याचं उत्तर शोधण्यासाठी नाव कसं तपासायचं याची माहिती पुढे दिली आहे.

तुमचं नाव यादीत कसं तपासणार?

स्टेप 1: पीएम किसानची अधिकृत वेबसाईट उघडा – https://pmkisan.gov.in/rpt_beneficiarystatus_pub.aspx
स्टेप 2: ‘State’ मध्ये Maharashtra निवडा
स्टेप 3: तुमचा District निवडा
स्टेप 4: Taluka/Block निवडा
स्टेप 5: तुमचं Village निवडा आणि Get Report वर क्लिक करा

यानंतर तुमच्या गावातील शेतकऱ्यांची संपूर्ण यादी दिसेल. त्या यादीत तुमचं नाव आहे का हे तपासा.

21 वा हप्ता कोणाला मिळणार?

महाराष्ट्रातील सुमारे 90 लाख 41 हजार शेतकरी हे 21 व्या हप्त्याचे लाभार्थी ठरणार आहेत.
19 नोव्हेंबरला ही रक्कम थेट खात्यात जमा होईल.
यापूर्वी 2 ऑगस्ट 2025 रोजी शेतकऱ्यांना 20 व्या हप्त्याची रक्कम देण्यात आली होती.

पीएम किसान योजना 2019 लोकसभा निवडणुकीच्या आधी सुरू झाली होती आणि पहिला हप्ता 24 फेब्रुवारी 2019 रोजी देण्यात आला. तेव्हापासून सलग 20 हप्त्यांचं वितरण पूर्ण झालं आहे.

महाराष्ट्र सरकारकडून शेतकऱ्यांना दरवेळी स्वतंत्र 2000 रुपये मिळतात. या राज्य योजनेचा पुढील हप्ता कधी जमा होणार याकडेही शेतकरी उत्सुकतेने पाहत आहेत.

ताज्या बातम्या शेती

Join WhatsApp

Join Now