बेसिनचा एक पाईप बसवण्यासाठी प्लंबरने मागितले तब्बल ४ लाख रुपये; वाचा संपुर्ण किस्सा

ब्रिटन | देशात नेहमी वेगवेळ्या घटना घडत असतात. काहीजण आपल्याबाबत घडलेली घटना सोशल मिडियावर शेअर करत असतात. त्यानंतर याची चर्चा चांगलीच रंगू लागते. ब्रिटनमध्येही एक अशीच अजब घटना समोर आली आहे.

घरातील पाण्याचा पाईपाबद्दल तक्रार असेल तर रिपेअर करायला आपण प्लंबरला बोलवतो. टीव्ही, फ्रिज किंवा लाईटची कामे असेल तर इलेक्ट्रिशियनला बोलावून काम करून घेतो. त्यानंतर त्याचा ठरलेला मोबदला देतो.

ब्रिटनमध्ये एश्ले डगलस नावाच्या एका तरूणाने त्याच्या घरातील किचनमध्ये बेसिनचे पाणी तुंबल्यानंतर एमपीएम कंपनीच्या प्लंबरला फोन करून बोलावून घेतले. काम झाल्यानंतर कामाचे पैसे किती झाले असं डगलसने विचारल्यावर त्याला तुमचं बील ४ लाख रुपये झाले असं सांगण्यात आलं. फक्त पाईप बसवण्याचे ४ लाख रुपये झाल्याचं ऐकून डगससच्या पायाखालची जमीनचं सरकली. 

द सनशी बोलताना २३ वर्षीय एश्ले डगलस म्हणाला की, घरात पाणी खुप वाया जात होतं. मी रिपेअरिंग कंपनीला फोन केल्यानंतर त्यांनी मेहदी पैरवी नावाचा प्लंबर पाठवला. प्लंबरला काय काम करायचं आहे हे दाखवल्यानंतर कामाच्या आधीच त्याला पैसे किती होतील याची विचारणा केली.

प्लंबर मेहदी पैरवीने डगलसचा प्रश्न ऐकून न ऐकल्यासारखा केला आणि  पाईप बसवण्याच्या  कामात मग्न झाला. पाईप बसवल्यानंतर मेहदी पैरवीने डगलसकडे ३९०० पाऊंड्स म्हणजे ४ लाख रुपये झाले असं सांगितलं आणि बील बनवलं.

डगलसने फक्त पाईप बसवण्याचे एवढे पैसे कसे काय झाले असं विचारलं असता प्लंबर म्हणाला की मी माझ्या कामावर आणि नॉलेजनुसार पैसे घेतो. माझ्या कामाचे मी एका तासाचे १ कोटी रुपये सुध्दा घेउ शकतो. मला नाही वाटत यामुळे कोणाला फरक पडेल. प्लंबरच्या या उत्तरावर डगलस चक्रावून गेला.

डगलससोबत वाद घालत  प्लंबर पैरवी त्याचवेळेस पैसे मागू लागला. डगलसला जाणवलं की हा प्लंबर जास्त पैसे मागून फसवणूक करण्याचा प्रयत्न करत आहे. डगलसने एका दुसऱ्या कंपनीला फोन करून पैसे किती होऊ शकतात याची विचारणा केल्यावर त्याने २५,००० होतील असं सांगितलं. यानंतर डगलसने प्लंबर मेहदी पैरवीच्या विरोधात पोलिसात तक्रार दाखल करण्याचं ठरवलं आहे.
महत्वाच्या बातम्या-
ओव्याचे आणि जिऱ्याचे पाणी पिल्याने होतील हे आश्चर्यकारक फायदे; वाचा…
काय सांगता! प्रेमासाठी जावयासोबत पळून आली सासू, पुढे जे घडले ते वाचून बसेल धक्का..
कोरोनामुळे आरोग्य व्यवस्थेचे वाजले बारा; वृद्धावर सायकलवरून मृतदेह नेण्याची आली वेळ
एका व्यक्तीजवळ किती सोनं असावे? जाणून घ्या सरकारचा नवीन नियम, नाहीतर सोनं होईल जप्त

 

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.