Suryakumar Yadav : क्राइस्टचर्चमध्ये खेळल्या जात असलेल्या तिसऱ्या वनडेमध्ये टीम इंडियाचे फलंदाज न्यूझीलंडच्या किलर बॉलिंगला बळी पडला. क्राइस्टचर्चमध्ये टीम इंडियाच्या एका फलंदाजाकडून भारतीय चाहत्यांना मोठ्या खेळीची अपेक्षा होती, पण त्याने संघाला अर्धवट सोडले.
न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात सूर्यकुमार यादव फ्लॉप ठरला आणि केवळ 6 धावा करून बाद झाला. सूर्यकुमार यादवच्या या फ्लॉप शोनंतर भारतीय चाहत्यांचा राग सातव्या गगनाला भिडला आहे. सोशल मीडियावर चाहते सूर्यकुमार यादवला ट्रोल करत आहेत.
सूर्यकुमार यादवचा एकदिवसीय क्रिकेटमधील विक्रम बघितला तर गेल्या 9 एकदिवसीय डावात त्याला एकही अर्धशतक झळकावता आलेले नाही. न्यूझीलंडविरुद्धच्या सध्याच्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत, सूर्यकुमार यादवने 4, 34 आणि 6 अश्या धावा केल्या आहेत.
न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात सूर्यकुमार यादव 6 धावा करून बाद होताच चाहत्यांनी सोशल मीडियावर त्याच्यावर टीका करण्यास सुरुवात केली. एकदिवसीय सामने खेळणे हे कोणत्याही टी-२० खेळाडूचे काम नाही, असे चाहत्यांचे म्हणणे आहे. त्याच वेळी, काही चाहत्यांनी सूर्यकुमार यादवच्या फलंदाजीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आणि सांगितले की तो तिन्ही फॉरमॅटमध्ये खेळण्यास सक्षम क्रिकेटर नाही आणि तो फक्त टी-20 क्रिकेट खेळू शकतो.
न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेत सूर्यकुमार यादवच्या फलंदाजीच्या क्रमाशी सातत्याने छेडछाड केली जात आहे. कधी त्याला तिसऱ्या क्रमांकावर पाठवले जाते, तर कधी तो पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला येतो. न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात सूर्यकुमार यादव 3 ऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला होता, मात्र तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात तो पुन्हा एकदा 5व्या क्रमांकावर फलंदाजीसाठी उतरला होता.
महत्वाच्या बातम्या
Suryakumar Yadav: ‘हा फक्त मोठ्या सामन्यांच्याच कामाचा आहे’ फायनल वनडेत सूर्याची खराब खेळी पाहून चाहते संतापले
Rishabh Pant : 10 धावांची खेळी खेळून आलेला थकवा दूर करण्यासाठी पंत करून घेत होता मसाज; लोकांनी झाप झाप झापले
Amitabh’s Bachchan Car : पोलीस स्टेशनला धूळ खात पडलीय अमिताभची 14 कोटींची गाडी; ‘या’ कारणामुळे सोडत नाहीत गाडी