“IPL सामन्यांवर केंद्राने बंदी आणून खेळाडूंनी खजिना जनतेसाठी खुला करावा”

पुणे । देशात सध्या कोरोना रुग्ण वाढत असताना आयपीएल स्पर्धा देखील सुरू आहे. यंदा आयपीएलचे विजेतेपद कोणाकडे जाणार यावरून उत्सुकता शिगेला पोहोचली असून कोरोनाच्या सावटामुळे मोजक्याच स्टेडियमवर सामने खेळवले जात आहेत. दरवर्षी या स्पर्धेवर मोठा खर्च केला जातो.

यामुळे आता ही स्पर्धा रद्द करण्याची मागणी जोर धरत आहे. बॉलिवूड कलाकार, परदेशी खेळाडू यांच्या पाठोपाठ राजकीय नेत्यांनी देखील IPL रद्द करण्याची मागणी केली आहे. आता राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानपरिषद आमदार अमोल मिटकरी यांनी सामन्यांवर बंदी आणण्याची मागणी केली आहे.

ते म्हणाले, IPL च्या मॅचेसवर केंद्र सरकारने बंदी आणावी. कोरोना सारख्या महामारीच्या काळात IPL च्या मॅचेस कशासाठी व कोणासाठी?? तात्काळ मॅचेस वर बंदी आणायला हवी, जनतेच्या जीवावर श्रीमंत होणाऱ्या क्रिकेटच्या खेळाडूंनी आपला खजिना गोरगरिबांसाठी खुला करायला हवा, असेही मिटकरी म्हणाले आहेत.

सध्या आयपीएलची स्पर्धेचे निम्मे सामने झाले आहेत. यामुळे आता ही स्पर्धा रद्द होणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सध्या भारतात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. रोज विक्रमी कोरोना रुग्णांची भर पडत असून या संकटातून भारत बाहेर पडावा यासाठी जगभरातून मदत केली जात आहे.

असे असताना देशात आयपीएलचा १४ वा हंगाम सध्या सुरु आहे. या अगोदर देखील अनेकांनी ही स्पर्धा रद्द करण्याची मागणी केली होती. यामुळे अर्ध्यावर असलेली ही स्पर्धा रद्द करण्याबाबत काय निर्णय घेतला जाणार याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.

अनेक खेळाडू देखील कोरोनामुळे स्पर्धा सोडून जात आहेत. त्यांना देखील कोरोनाचा धोका आहे. आता केंद्र सरकार आणि बीसीसीआय काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

ताज्या बातम्या

उद्योगपतींसोबत घेतलेल्या बैठकीनंतर आनंद महिंद्रांनी उद्धव ठाकरेंच्या ‘या’ गोष्टीचं केलं कौतूक; म्हणाले…

सावधान! ही लक्षणे दिसताच घ्या काळजी, तुम्ही असू शकता कोरोना पॉझिटिव्ह; एम्सच्या तज्ज्ञांनी दिली माहिती

रोज सेटवर येऊन बसायची हेमामालिनीची आई; फिरोज खानला एकही रोमॅंटीक सीन करू दिला नाही

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.