एकेकाळी जेवायला पैसे नसल्यामुळे मॅगी खाऊन दिवस काढणारा खेळाडू घालतोय एक कोटीचे घड्याळ

आपण बघत असतो की आपल्या देशात अंत्यत गरिबीत दिवस काढून अनेकजण आता खुप पैसे कमवतात. यासाठी त्यांनी खुप मेहनत घेतली प्रसंगी उपाशी दिवस काढले. अशा व्यक्तींमध्ये नाव येते ते म्हणजे आयपीएलच्या मुंबई इंडियन्स संघाचे ‘पंड्या ब्रदर्स’.

या दोन भावांना एकेकाळी जेवणाचे वांदे होते, ते आज आपल्या अंगावर करोडोंच्या वस्तू वापरतात. हार्दिक पंड्या आणि कृणाल पंड्या हे खूप गरिबीतून मोठे झाले आहेत. त्यांच्याकडे अन्न मिळवण्यासाठी देखील पैसे नव्हते.

ते फक्त दिवसभर ५ रुपयांना मिळणारी मॅगी खाऊन ते आपली भूक भागवत होते. आज मात्र करोडोंची संपत्ती त्यांच्याकडे आहे हे केवळ त्यांनी केलेल्या मेहनतीमुळे शक्य झाले आहे.

त्याकाळी ५ रुपयांना मॅगी येत असे आणि तीच आम्ही भाऊ मैदानावर बनवून खायचो. नाश्ता, जेवण सगळे तेच होते. हा दिनक्रम अगदी ३६५ दिवस चालत असत. आम्ही भाऊ दिवसभर मैदानात पडून रहायचो. बाहेर चिक्कार उधारी झाली होती, असे एका मुलाखतीत हार्दीकने सांगितले आहे.

पुढे तो म्हणाला, जेवढे मिळायचे ते लगेच संपून जायचे. १० रुपये सोडा ५ रुपयांचे पण वांधे होते. मी मोठ्या प्रमाणावर कर्जात बुडून गेलो होतो. मी जेवढे कमावायचो सगळे उधारी मिटवण्यात जायचे, असेही त्याने म्हटले आहे.

कधी नशीब बदलेल सांगता येत नाही. जेवणासाठी पैसे नसलेल्या या जोडीकडे आता करोडोंची संपत्ती आहे. हार्दिककडे तर आता १.०१ कोटी रुपयांचे हीरे जडलेले रोलेक्स घड्याळ आहे. अशा अनेक वस्तू त्यांच्याकडे आहेत.

त्याच्याकडे महागडे कपडे, घर, गाड्या अशा सर्व गोष्टी आहेत. अंत्यत कठीण परिस्थितीत त्यांनी दिवस काढले आहेत. दिवस वाईट होते मात्र ते मागे हटले नाहीत आणि आज जे काही त्यांच्याकडे आहे ते सर्वांसमोर आहे.

नुकताच हार्दीकचा जन्मदिवस साजरा करण्यात आला. हार्दिकचा भाऊ कृणालनेही ट्विटरवर त्यांचा दोघांचा व्हिडिओ शेअर करत त्याला शुभेच्छा दिल्या आहेत. कृणालने लिहिले की, “मैदानावरही आणि मैदानाबाहेरही. चांगल्या काळातही आणि नक्कीच वाईट काळातही.

नेहमी मी तुझीच बाजू घेणार माझ्या लहान भावा. तुला वाढदिवसांच्या खूप खूप शुभेच्छा.” अशी पोस्ट टाकून त्याने शुभेच्छा दिल्या. ते सध्या मुंबई इंडियन्स टीमकडून आयपीएल खेळत आहेत.

भारतीय क्रिकेट संघात हार्दिक एक स्टार खेळाडू म्हणून ओळखला जातो. तो ऑलराऊंडर आहे. भारतीय संघात आणि मुंबई इंडियन्सच्या संघात त्याची कामगिरी धडाकेबाज राहिली आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.