पाकिस्तानमध्ये क्रिकेट खेळण्यास नकार, मात्र भारतात नाही, कारण पैसा बोलतो – उस्मान ख्वाजा

ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू उस्मान ख्वाजा याने पाकिस्तानमध्ये आंतरराष्ट्रीय सामने आयोजित करण्याबाबत मत व्यक्त केले आहे. सध्या क्रिकेट खेळणारे मोठे देश अजूनही पाकिस्तानात जाण्यास टाळाटाळ करत आहेत. तेथील सुरक्षिततेचा प्रश्न उपस्थित केला जातो. यामुळे अचानक दौरे रद्द होत आहेत.

असे असताना पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला नुकताच मोठा धक्का बसला. याचे कारण म्हणजे न्यूझीलंडने कोणताही सामना न खेळता आपला दौरा रद्द केला. यानंतर, इंग्लंडने त्यांच्या दोन टी -20 आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या मालिकेसाठी दौरा करण्यास नकार दिला. यामुळे पाकिस्तानमध्ये आता क्रिकेट स्पर्धा होणार की नाही असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

याबाबत ख्वाजा म्हणाला की, पाकिस्तानने पीएसएलचे आयोजन अत्यंत सुरक्षितपणे केले. यानंतर देश क्रिकेट खेळण्यासाठी सुरक्षित असल्याचे पाकिस्तानने सिद्ध केले आहे. यामुळे आता देशात मोठे सामने खेळायला काहीच अडचण नाही. आता पाकिस्तानमध्ये चांगली सुरक्षा व्यवस्था आहे.

तसेच मला वाटते की खेळाडूंना पाकिस्तानमध्ये खेळायला नकार देणे खूप सोपे आहे. कारण हा पाकिस्तान आहे. मला वाटते की बांगलादेशबद्दल असता तरी हाच विचार झाला असता. पण जर भारत या स्थितीत असेल तर कोणीही खेळण्यास नकार देणार नाहीत.

ख्वाजा म्हणाला, ‘पैसा बोलतो, हे आपल्या सर्वांना माहित आहे, आणि हे कदाचित त्यामागे एक मोठे कारण आहे. आता तरी देशात मोठ्या स्पर्धा झाल्या पाहिजेत. यामुळे मोठे नुकसान होत आहे. यामुळे यावर निर्णय घेऊन लवकरात लवकर सामने सुरू करायला हवेत.

ऑस्ट्रेलिया २०२२ मध्ये पाकिस्तानचा दौरा करणार आहे. पण पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष रमीज राजा यांचे म्हणणे आहे की, ऑस्ट्रेलिया देखील इंग्लंड आणि न्यूझीलंड सारखा निर्णय घेऊ शकते. ख्वाजा इस्लामाबाद युनायटेडकडून या वर्षी पाकिस्तानमध्ये झालेल्या PSL मध्ये खेळला. तो म्हणाला, अलिकडच्या काळात पाकिस्तानमधील सुरक्षा व्यवस्था अनेक पटींनी सुधारली आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.