‘दिलबर गर्ल’ नोरा फतेहीने हिंदी गाण्यावर केली भन्नाट लावणी; व्हिडिओ पाहून चाहते घायाळ

सध्याच्या घडीला नोरा फतेही फिल्म इंडस्ट्रीतील सर्वात प्रसिद्ध डान्सर आहे. नोराच्या डान्सने सर्वांना वेडं करून सोडले आहे. लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण नोराच्या डान्सचे दिवाने झाले आहेत.

नोराचा चाहता वर्ग खुप मोठा आहे. ती तिच्या चाहत्यांसाठी रोज वेगवेगळ्या फोटो आणि व्हिडिओ पोस्ट करत असते. तिच्या सौंदर्याने देखील लाखो लोकं वेडे झाले आहेत. नोरा फतेहीने हिंदी गाण्यावर केलेल्या लावणीचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

कलर्स टीव्ही वरील डान्स दिवाने ३ च्या मंचावर नोरा फतेही जज आहे. मंचावर स्पर्धक सुचनाने ‘अप्सरा आली’ गाण्यावर लावणी सादर केली. त्यानंतर नोरासोबत लावणी करण्याची इच्छा सुचनाला झाली. नोराने आणि सुचनाने ‘हाय गर्मी’ या हिंदी गाण्यावर मराठमोळी लावणी केली आहे.

नोराची लावणी पाहून चाहते घायाळ झाले आहेत. कलर्स टीव्हीने इन्स्टाग्रामवर हा व्हिडिओ पोस्ट केला आहे. व्हिडिओला नोराला लावणी करताना पाहायचंय का? तर पाहा नोराचा आणि सुचनाचा स्टेजवर आग लावणारा परफॉर्मन्स.. असं कॅप्शन दिलं आहे.

नोरा फतेहीने बॉलिवूडमध्ये आयटम सॉंग्स केले आहेत. मल्याळम आणि तेलगू चित्रपटांमधून नोराने करिअरला सुरूवात केली  आहे. नोराने जॉन अब्राहमच्या ‘सत्यमेव जयते’ चित्रपटात दिलबर दिलबर हे आयटम सॉंग केले आहे.

नोराचा जन्म कॅनडामध्ये झाला होता. पण अभिनयाचे स्वप्न पुर्ण करण्यासाठी नोरा भारतात आली होती. तिच्यासाठी कॅनडा ते भारत हा प्रवास सोपा नव्हता. तिला यासाठी खुप जास्त मेहनत करावी लागली होती. दिवसरात्र एक करावे लागले होते.

नोरा पहील्यांदा भारतात आली त्यावेळी तिला हिंदी येत नव्हते. त्यामूळे तिला खुप अडचणींचा सामना करावा लागला होता. तिने मेहनत करण्याची तयारी ठेवली आणि आज ती इंडस्ट्रीतील सर्वात मोठी स्टार आहे.
महत्वाच्या बातम्या-
मुलींचे जीन्स घालणे धर्मेंद्रला नव्हते पसंत; धर्मेंद्र आल्यानंतर लगेच ड्रेस बदलत होत्या इशा आणि आहाना
वाढीव लाईटबिलामुळे त्रस्त आहात? या गोष्टी करा परत वाढीव लाईटबिल येणार नाही
हा मराठी अभिनेता करतोय दुसऱ्यांदा लग्न, पहिली बायको ‘सुंदरा मनामध्ये भरली’ मधील प्रसिद्ध अभिनेत्री
अरे देवा! अभिनेते मेहमूदने एका चित्रपटात त्यांच्या सख्या बहीणीसोबत केला आहे रोमान्स

 

 

 

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.