जगातील अशी ६ ठिकाणं जिथे कधीच होत नाही अंधार; रात्रीच्या १२ वाजताही चमकत असतो सुर्य

१२ तास दिवस आणि १२ तास या निसर्गाच्या नियमानुसार आपले शरीर बनलेले आहे. पण कल्पना करा, जर रात्री 12 वाजता तुम्ही दुपारच्या प्रकाशात असाल तर तुम्ही झोपू शकाल का? ही कोणत्याही कल्पनारम्य किंवा कोणत्याही चित्रपटाची कथा नाही, परंतु जगात असे अनेक देश आहेत जेथे रात्री अगदी सकाळ असते, म्हणजेच या ठिकाणी सूर्य कधीच मावळत नाही. आज आपणअशाच काही ठिकाणींबद्दल जाणून घेणार आहोत.

नॉर्वे
आर्क्टिक सर्कलमध्ये स्थित नॉर्वे मध्यरात्रीच्या सूर्यासाठी देखील ओळखला जातो. असे यामुळे म्हटले जाते कारण मे पासून जुलैच्या शेवटपर्यंत येथे सूर्य कधीही मावळत नाही. याचा अर्थ असा की ७६ दिवस इथे फक्त दिवसत असतो. नॉर्वेच्या स्वालबार्डमध्ये १० एप्रिल ते २३ ऑगस्टपर्यंत सूर्य सतत चमकत असतो.

नुनावुत
कॅनडातील नुनावत शहराची लोकसंख्या फक्त ३००० आहे. या शहरात जवळपास दोन महिने सतत सूर्यप्रकाश मिळतो. त्यानंतर जेव्हा हिवाळा येतो, तेव्हा हे शहर सलग ३० दिवस पूर्णपणे अंधारात बुडलेले राहते. हे कॅनडाच्या वायव्य प्रदेशातील आर्क्टिक सर्कलच्या दोन अंशांवर स्थित आहे.

आइसलँड
आइसलँडचे नाव तुम्ही ऐकले असेल, आइसलँड हे युरोपमधील दुसरे मोठे बेट आहे. विशेष म्हणजे या देशात एकही मच्छर नाही, त्यामुळेही हा देश ओळखला जातो. जून महिन्यात, येथे सूर्य कधीच मावळत नाही आणि याठिकाणी रात्रीही सकाळप्रमाणे उजेड असतो.

बॅरो
अलास्कामधील बॅरो शहर हे जगातील त्या ठिकाणांपैकी एक आहे जिथे मे महिन्याच्या अखेरीपासून जुलैच्या अखेरीस रात्र नसते. तसेच नोव्हेंबरच्या सुरुवातीपासून पुढील 30 दिवसांसाठी सकाळ दिसत नाही. या दिवसांना पोलर नाइट्स’ म्हणतात.

फिनलँड
हजारो तलाव आणि बेटांसह फिनलंडचा बहुतेक भाग उन्हाळ्यात ७३ दिवस सूर्यप्रकाशाने प्रकाशित असतो. हिवाळ्यात मात्र याचे नेमके उलटे दिसते, कारण तेव्हा फक्त आणि फक्त फक्त रात्रच दिसते. यामुळेच येथील लोक हिवाळ्यात जास्त झोपतात.

स्वीडन
मे महिन्याच्या सुरुवातीपासून ऑगस्टच्या अखेरीपर्यंत, स्वीडनमध्ये मध्यरात्रीच्या सुमारास सुर्य मावळतो. सलग सहा महिने येथे सकाळ राहू शकतात. त्यामुळे हा देश बहुतेक पर्यटकांची पहिली पसंती बनतो ज्यांना निसर्गाचे चमत्कार पाहायचे आहेत.

महत्वाच्या बातम्या-

तुरुंगात असणाऱ्या नेत्यासह त्याच्या पत्नीला ओवैसींनी एमआयएममध्ये घेतलं; विरोधकांनी टीका करताच दिलं ‘हे’ उत्तर
‘या’ कारणामुळे अजय व काजोल देवगणच्या मुलीला जावं लागलं परदेशी; काजोलने सांगितलं यामागचं धक्कादायक सत्य
मोठी बातमी! रिलायन्सच्या शेअर्समध्ये मोठी वाढ, मुकेश अंबानी १०० अब्ज डॉलर्स क्लबच्या शर्यतीत

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.