पिंपरी चिंचवडमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. व्हाट्सअपच्या माध्यमातून सुरु असलेल्या सेक्स रॅकेटचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी पिंपरी चिंचवड परिसरातील हॉटेल कामिनी या ठिकाणी छापा टाकला. या प्रकरणात पोलिसांनी तीन आरोपींविरोधात गुन्हा नोंदवला आहे.(pimpari chinchwad sex racket news)
हॉटेल कामिनी या ठिकाणी मुलींना जबरदस्तीने वेश्याव्यवसाय करण्यास भाग पडले जात होते. व्हाट्सअपच्या माध्यमातून हे सेक्स रॅकेट सुरु होते. पोलिसांनी अखेर कारवाई करत या मुलींची सुटका केली आहे. यातील २ मुली दिल्लीच्या आहेत आणि एक मुलगी छत्तीसगड राज्यातील आहे. आम्हाला डांबून ठेवून जबरदस्तीने आमच्याकडून ही कामे करवून घेतली जातात, असा आरोप त्या मुलींनी केला आहे.
या प्रकरणात पोलिसांनी जॅक, बबलू आणि करण नावाच्या व्यक्तींवर गुन्हा दाखल केला आहे. आरोपी पिंपरी चिंचवड परिसरातील हॉटेल कामिनी येथे सेक्स रॅकेट चालवत होते. आरोपी पीडित मुलींकडून जबरदस्तीने वेश्याव्यवसाय करून घेत होते. याकरिता आरोपी ग्राहकांकडून ८ हजार ते २० हजार पर्यंतची रक्कम घेत होते.
यामधून आरोपींना मोठे कमिशन मिळत होते. आरोपी व्हाट्सअपवर पीडित मुलींचे फोटो पाठवायचे आणि व्हाट्सअपच्या माध्यमातून संवाद साधत आरोपी ग्राहकांना हॉटेल कामिनी या ठिकाणी बोलवायचे. कुणालाही समझू न देता हॉटेल कामिनीमध्ये हा प्रकार सुरु होता. पोलिसांकडे यासंदर्भात तक्रार करण्यात आली.
यानंतर पोलिसांनी खातरजमा करून त्या ठिकाणी छापा टाकल्यानंतर हा प्रकार समोर आला आहे. पोलिस या प्रकरणाचा आणखी तपास करत आहेत. काही दिवसांपूर्वी नवी मुंबई जवळ असणाऱ्या पनवेलमध्ये खंडेश्वर पोलिसांनी छापा टाकला होता. पनवेलमध्ये तरुणींकडून जबरदस्तीने वेश्याव्यवसाय करण्यात येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.
आरोपी पीडित तरुणींना जबरदस्तीने वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडत होते. पोलिसांनी एकूण सहा पीडित तरुणींची सुटका केली आहे. आरोपी तरुण हे पीडित तरुणींचे फोटो ग्राहकांना पाठवून त्यांना आपल्या जाळयात ओढत होते. आरोपी ग्राहकांकडून मोठी रक्कम घेत होते. या प्रकरणात कारवाई करत पोलिसांनी आरोपींना अटक केली होती.
महत्वाच्या बातम्या :-
लालू प्रसाद यादव यांची तब्येत खालावली; डझनभर आजारांसोबत किडनी फक्त 20 टक्के कार्यरत…
ऋतिक रोशन पुन्हा दिसला त्याच्या कथित गर्लफ्रेंडसोबत, व्हायरल फोटोनंतर अफेअरच्या चर्चांना उधाण
‘पावनखिंड’ने विक्रम रचला! अवघ्या तीन दिवसात कमावला ‘एवढ्या’ कोटींचा गल्ला..