Homeताज्या बातम्यापिंपरी चिंचवड महापालिका नागरिकांना मोफत वडापाव देणार; फक्त करावे लागेल ‘हे’...

पिंपरी चिंचवड महापालिका नागरिकांना मोफत वडापाव देणार; फक्त करावे लागेल ‘हे’ काम

अनेकदा लोक रिकाम्या पाण्याच्या बाटल्या उघड्यावर टाकतात. यामुळे बहुतेक शहरामध्ये आपल्याला प्लास्टिकच्या कचऱ्याचा ढीग पाहायला मिळतो. या सगळया गोष्टी थांबवण्यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकार प्रयत्न करत आहेत. आता महाराष्ट्रातील महानगरपालिकांनी प्लास्टिकचा कचरा कमी करण्यासाठी वेगवेगळे उपक्रम राबवण्यास सुरवात केली आहे.

‘प्लास्टिकच्या रिकाम्या बॉटल द्या , अन वडापाव घ्या’ असा एक भन्नाट उपक्रम महाराष्ट्रातील पिंपरी-चिंचवड या महानगरपालिकेने राबवला आहे. या उपक्रमांतर्गत रिकाम्या प्लास्टिकच्या बाटल्या जमा करणाऱ्या व्यक्तीला चहा आणि नाश्ता मिळणार आहे. या उपक्रमाची संपूर्ण महाराष्ट्रात चर्चा होत आहे.

केंद्र सरकारच्या स्मार्टसिटी या प्रकल्पांतर्गत हा उपक्रम पिंपरी-चिंचवड या महानगरपालिकेत राबविला जात आहे. पिंपरी-चिंचवड शहराचा विकास करत असताना प्लास्टिकचा कचरा कमी करण्यासाठी महानगरपालिका प्रयत्न करत आहे. त्यासाठी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने हा अनोखा उपक्रम राबविला आहे.

हा उपक्रम राबविण्यासाठी महानगरपालिका शहरातील छोटे व्यवसायिक, हातगाडीवाले यांना या उपक्रमात सहभागी करणार आहे. या उपक्रमांतर्गत पाच प्लास्टिकच्या बाटल्या जमा करणाऱ्या व्यक्तीला चहा मिळणार आहे. तर दहा प्लास्टिकच्या बाटल्या जमा करणाऱ्या व्यक्तीला एक वडापाव संबंधित हॉटेल व्यावसायिक अथवा विक्रेत्याकडून मिळणार आहे.

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या या उपक्रमामुळे लोकांमध्ये जागृती होण्यास मदत होणार आहे. कुठेही प्लास्टिकचा कचरा न टाकता योग्य ठिकाणी तो जमा केला, तर त्याचा मोबदला मिळणार आहे. या विचारातून प्लास्टिकचा कचरा शहरात कमी होईल, अशी आशा महापालिका प्रशासनाने व्यक्त केली आहे.

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या या उपक्रमात सहभागी होणाऱ्या विक्रेत्यांना आणि हॉटेल व्यावसायिकांना १० रुपयांचा मोबदला मिळणार आहे. जर एखाद्या व्यक्तीने दहा बाटल्या जमा केल्या, तर त्याला एक वडापाव मिळणार आहे. त्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिका हॉटेल मालकाला १५ रुपये देणार असल्याची माहिती आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. के. अनिल रॉय यांनी दिली आहे.

या उपक्रमात सहभागी होण्यासाठी विक्रेत्यांना महापालिकेच्या मुख्य इमारतीतील आरोग्य मुख्य कार्यालय, दुसरा मजला येथे नोंदणी करून अर्ज सादर करावा लागणार आहे. मात्र नोंदणी करणाऱ्या व्यावसायिक अथवा टपरी, हातगाडी विक्रेत्याकडे अधिकृत अन्न परवाना तसेच व्यवसायाच्या ठिकाणी स्वच्छता असणे गरजेचे राहणार आहे.

महत्वाच्या बातम्या :-
शाहरूखला मिळाला स्टार जावई, ‘या’ सुपरस्टारच्या घरची सून होणार सुहाना खान?
२०२१ मध्ये ‘या’ साऊथच्या चित्रपटांनी घातला धुमाकूळ, कमावला बक्कळ पैसा आणि प्रेक्षकांचे प्रेम
‘मेरी थुक में जान है’ म्हणत महिलेच्या केसात थुंकला जावेद हबीब, मुख्यमंत्र्यांपर्यंत गेली तक्रार, पहा व्हिडीओ