पायलटने त्याच्या पत्नीला परफेक्ट प्लॅन करुन संपवले, मात्र ‘या’ एका गोष्टीवरून पोलिसांनी लावला छडा

एखाद्याची हत्या करून कोणत्याही आरोपीला असे वाटते की, आपणकेलेला गुन्हा कोणालाही समजणार नाही. आरोपी हा कितीही हुशार असला तरी तो काही ना काही पुरावा नक्कीच ठेवतो, फक्त तो पुरावा पोलिसांनी बरोबर ओळखायला आला पाहिजेल. अशीच एक घटना ग्रीसमध्ये घडली आहे.

एका हेलिकॉप्टर पायलटने आपल्या पत्नीला मारण्याचा असा प्लॅन रचला की, तो पोलिसांना तो कधीच सापडणार नाही. मात्र, पोलिसांनी त्याला पुराव्यांसकट शोधून काढलेच ते कशाप्रकारे आपण जाणून घेऊयात. या हॅलिकॉप्टर पायलट ३३ वर्षाचा असून, त्याचे नाव बाबीस अनाग्मोस्टोपॉलोस आहे. तर त्याच्या २० वर्षाच्या पत्नीचे नाव कॅरोलिन क्रॉउच आहे. हे दोघे पती पत्नी आणि त्यांचे लहान बाळ एका बेटावर फिरायला गेले होते.

तेव्हा या पायलटने आपल्या पत्नीची हत्या केली. या घटनेची माहिती पोलिसांना देताना पायलट बाबीस अनाग्मोस्टोपॉलोस म्हणाला की, या बेटावर काही चोरट्यांची टोळी आली, ज्यांनी त्याला एका खांब्याला बांधून ठेवले आणि त्याच्या पत्नीची हत्या केली. त्याने पोलिसांना हे देखील सांगितले की, त्यांच्या घरातील सीसीटीव्हीला ही या चोरट्यांनी 4-5 तासांपूर्वी बंद केले होते.

बाबीसने खरेतर हा एक परफेक्ट मर्डर प्लॅन केला होता. कारण बेटावर जास्त लोकसंख्या नसते हे त्याला माहित होते. तसेच घराचा सीसीटीव्ही बंद असल्याचे सांगितल्यानंतर आजू बाजूला लोकवस्ती नसल्याने पोलिसांना कोणताही पुरावा मिळणार नाही हे त्याला माहित होते. मात्र, पोलिसांना नंतर बाबीसच्या स्टेप ट्रॅकर आणि पत्नीच्या हातील स्मार्ट घडाळ्यामुळे काही संशयात्मक पुरावे सापडले. ज्यामुळे पोलिसांनी बाबीसला अटक केले.

बाबीसने पोलिसांना त्याच्या पत्नीच्या मृत्यूची जी वेळ सांगितली होती. त्यावेळी त्याची पत्नी जिवंत होती आणि तिच्या हृदयाचे ठोके सुरू होते. हे पोलिसांना त्याच्या पत्नीच्या हातातून मिळालेल्या घडाळ्यावरुन समजले. त्यानंतर पोलिसांना बाबीसवर संशय आला आणि त्यांनी आणखी पुरावे जमवायला सुरवात केली. पोलिसांना हे बाबीसच्या स्टेप ट्रॅकरच्या माध्यमातून समोर आले.

एवढेच काय तर बाबीसने सांगितलेल्या वेळेआधी किंवा त्या वेळेनंतर त्याचे स्टेप ट्रॅकिंग तो चालत असल्याचे दाखवत आहे. बाबीस एका जागेवरती थांबलाच नव्हता किंवा त्याला बांधले गेले नव्हते असे पोलिसांच्या लक्षात आले. त्यानंतर पोलिसांनी या सगळ्याचा पुरावा देत. बाबीसला बोलते केले आणि बाबीसनेही आपला गुन्हा मान्य केला.

ताज्या बातम्या

WTC फायनल: पावसामुळे खेळ थांबला म्हणून काय झालं; भारतीय खेळाडूंनी सुरु केला ‘वेगळाच’ खेळ

हातातल्या बॅगमुळे नोरा पुन्हा आली चर्चेत, बॅगची किंमत ऐकून बसेल धक्का, जाणून घ्या..

बाबो! बायकोचं कौतूक करणं नवऱ्याला पडलं महागात, बायको चाकु घेऊन लागली मागे; पहा व्हिडिओ

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.