PI संजय निकम यांची पत्रकारांवर दादागिरी; लालबागच्या राजाचे कव्हरेज करणाऱ्या पत्रकारांना केली धक्काबुक्की

ज्या दिवसाची सर्वजण आतुरतेने वाट बघत होते, तो दिवस आज उगवला आहे. आज गणपती बाप्पाचे आगमन झाले आहे. लालबागच्या राजाची स्थापना झाली आहे. पण यावेळी तिथे धक्कादायक प्रकार घडला आहे.

लालबागच्या राजाच्या परीसरात बऱ्याचदा कार्यकर्त्यांचे वादविवाद दिसून येतात. पण आता पोलिसांकडून पत्रकारांना आरेरावी करण्यात आली आहे. यावेळी पोलिसांनी पत्रकार रिपोर्टींगपासून थांबवत धक्काबुक्कीही केली आहे.

पोलिस निरीक्षक संजय निकम यांनी वार्तांकन करणाऱ्या पत्रकारांना धक्काबुक्की केली आहे. विशेष म्हणजे यावेळी संजय निकम यांनी स्वत: मास्क लावलेला नव्हता. अशात पत्रकारांनी संजय निकम यांना प्रेमाने बोलण्यास सांगितले, तर संजय निकमांनी आणखी राग व्यक्त केला आहे.

संजय निकम जिव्हा पत्रकारांना धक्काबुक्की करत होते, त्यावेळी पत्रकारांनी हात लावू नका असे सांगितले. तेव्हा संजय निकम म्हणाले, की हात काय पाय सुद्धा लावून दाखवतो, अशी गुंडगिरीची भाषा केली आहे. या घटनेचा व्हिडिओही सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

पोलिसांच्या अशा वागणूकीमुळे अनेकांनी राज्याच्या गृहखात्यावर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. कायदा राखणाऱ्यांनी अरेरावी केली तर विचारायचं कुणाला हा प्रश्न सर्व सामान्यांना पडला आहे. आम्ही या प्रकणाचा निषेध करतो, असे विधानपरिषदेच्या विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी म्हटले आहे.

पत्रकारांना लालबागच्या राजाचे कव्हरेज करायचे होते. त्यासाठी त्यांनी पासेस सुद्धा काढले होते, पण पोलिस त्यांना सकाळपासून एंट्री देत नव्हते. पोलिस अधिकाऱ्यांना विनंती करुन त्यांनी आतमध्ये जाण्याचा प्रयत्न केला पण संजय निकम यांनी पत्रकारांना धक्काबुक्की केली आहे.

महत्वाच्या बातम्या-

मुलांच्या ट्रोलींगमुळे करीनाला दुख: अनावर; “किती गोड मुलं आहेत माझी पण लोक त्यांना…
गंगा नदीच्या पाण्यात सापडले कोरोना व्हायरस? रिसर्च केल्यावर झाला मोठा खुलासा…
तारक मेहता शोच शुटींग थांबलं! दोन कलाकारांची तब्येत बिघडल्याने निर्मात्यांनी घेतला ‘हा’ निर्णय….

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.