स्म्रिती मंधानाच्या ‘त्या’ फोटोवर चाहते घायाळ, म्हणाले, बॉलिवूड अभिनेत्री पेक्षा…

मुंबई । भारतात अनेक क्रिकेटप्रेमी आहेत. भारतीय महिला खेळाडूंचे देखील अनेक चाहते आहेत. भारतीय महिला खेळाडू देखील आपल्या भारताचा नाव रोशन करत असतात. इंग्लंड दौऱ्यातील एकमेव कसोटी सामन्यात भारतीय महिला संघाने यश मिळवले.

पहिल्या डावात १६५ धावांची आघाडी मिळाल्यानंतर इंग्लंडने भारताला फॉलोऑन देण्याचा निर्णय घेतला. फॉलोऑननंतर भारतीय महिला संघाने जोरदार पुनरागमन करत सामना अनिर्णीत राखण्यात यश मिळवले. या सामन्यात भारतीय सलामीवीर स्म्रिती मधांनाचा फलंदाजीदरम्यान एक फोटो सोशल मीडीयावर तुफान व्हायरल झाला आहे.

अनेक क्रिकेट चाहत्यांनी हा फोटो शेअर करत ती बॉलीवूड अभिनेत्रीपेक्षा सुंदर दिसते अशी प्रतिक्रिया दिली आहे. तसेच काही चाहत्यांनी बॉलीवूड अभिनेत्रीप्रमाणे स्म्रितीला कोणत्याही सौंदर्य प्रसाधनाची गरज नाही, अशी प्रतिक्रिया दिली आहे. यासह काही चाहत्यांनी तिच्या सौंदर्याचे कौतुक केले आहे.

या सामन्यात स्म्रितीने पहिल्या डावात शानदार अर्धशतक झळकावत ७८ धावांची खेळी केली होती. भारताचा पहिला डाव २१७ धावांवर आटोपल्यानंतर इंग्लंडने फॉलोऑन देत दुसऱ्या डावात फलंदाजीसाठी पाचारण केले. यानंतर भारतीय संघाने जोरदार मुसंडी मारत पुनरागमन केले.

दुसऱ्या डावात भारतीय संघाने ८ गडी गमावत ३४४ धावांची मजल मारत सामना अनिर्णीत राखला. १९९ वर ७ बाद या स्थितीतुन स्नेह राणाने ८० धावांची नाबाद खेळी करत इंग्लंडच्या हाताशी आलेला विजयाचा घास हिरावुन घेतला. तेव्हापासून स्म्रितीची चर्चा सगळीकडे सुरू आहे. आता तिच्या चाहत्यांची लिस्ट पण वाढली आहे.

ताज्या बातम्या

काय सांगता! हिऱ्याच्या शोधात गावकऱ्यांनी खोदला डोंगर, आणि …

मोठी बातमी! संपत्तीसाठी भावांकडून माजी मंत्री विजय शिवतारेंचा छळ, मुलीच्या आरोपाने खळबळ

‘हम काले हुए तो क्या हुआ’ गाण्यामूळे मनोज कुमार आणि मेहमूदमध्ये झाले होते मोठे भांडण

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.