डॉक्टर नाही देवचं! पीपीई किट काढून डॉक्टरने शेअर केला फोटो; अवस्था पाहून डोळे पाणावतील

देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार माजवला आहे. कोरोनाने रुग्णांच्या मृत्यूचं प्रमाणही दिवसेंदिवस वाढत चाललं आहे. कोरोनाने देशातील वातावरण चिंताजनक झालं आहे. कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासन कठोर निर्बंधांची अंमलबजावणी करत आहे.

गेल्या वर्षभरापासून डॉक्टर, पोलिस कर्मचारी, नर्स, महापालिकेचे आरोग्य अधिकारी जीवाची बाजी लावून न थकता काम करत आहेत. आपल्या परिवाराचा विचार न करता हे कोरोना योध्दे रुग्णांसाठी काम करत आहेत.

कोरोना योध्दे काम करत असताना त्यांना कोरोनाची लागण होऊ नये. यासाठी पीपीई किट, मास्क, हॅण्डग्लोज घालून काम करत आहेत. एवढ्या गरमीमध्येही कोरोना योध्दे आपले कर्तव्य बजावत आहेत. याचच वास्तव दाखवणारा एक फोटो सोशल मिडियावर  व्हायरल झाला आहे.

डॉ. सोहेल यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर एक घामाने ओलेचिंब झालेला फोटो पोस्ट केला आहे. डॉ. सोहेल यांनी पीपीई किट घातलेला आणि त्यानंतर काम करून झाल्यानंतर डॉक्टरांची काय अवस्था होते हे दाखवले आहे.

डॉ. सोहेल यांच्या घामाने ओलेचिंब झालेला फोटो सोशल मिडियावर तुफान व्हायरल झालेला आहे. कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिले की, “अभिमान आहे का देशासाठी काहीतरी करत आहे. सर्व डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांकडून मला सांगायचं आहे की, आम्ही आमच्या कुटूंबापासून लांब  राहून मेहनत करीत आहे”.

“कधी कधी पॉझिटिव्ह रूग्णापासून एक पाऊल, तर गंभीर आजारी असलेल्या ज्येष्ठ व्यक्तीपासून एक इंचापासून लांब असतो. मी सर्वांना विनंती करतो की, त्यांनी कृपया  लसीकरण करून घ्यावे. सध्या हा एकमेव उपाय आहे. सुरक्षित राहा”.

दरम्यान डॉक्टर, आरोग्य कर्मचारी काम करत असताना रुग्णांचा मृत्यू झाला तर रुग्णाचे नातेवाईक डॉक्टरांना मारहाण करत असतात. रुग्णालयाची तोडफोड करत असतात. मात्र डॉक्टर नावाचा देवदुत रुग्णांचा जीव वाचवण्यासाठी किती धडपडून काम करत असतात. हे या फोटोवरून दिसत आहे.
महत्वाच्या बातम्या-
धक्कादायक! कोरोना रुग्णाला फक्त २५ किलोमीटर नेण्यासाठी रुग्णवाहिका चालाकाने घेतले ४२ हजार
अभिनायाबरोबेर खेळातही तरबेज होता महाभारतातील भीमा, जिंकले होते गोल्ड मेडल; जाणून आश्चर्य वाटेल
बेड न मिळाल्यामुळे मृत्यू झालेल्या भाजप आमदाराचा मुलगा मोदींवर संतापला; म्हणाला कित्येक फोन केले पण..

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.