अप्सरेचा साखरपुडा झाला! फोटो शेअर करून म्हणतेय ‘मी नाही तशी’

मुंबई | मराठमोळी अभिनेत्री आणि मराठी चित्रपटसृष्टीची अप्सरा सोनाली कुलकर्णी लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. कुणाल बेनोडेकरसोबत तिचा साखरपुडा झाला आहे. यामुळे ती लवकरच लग्नगाठ बांधणार हे नक्की झाले आहे. मात्र अद्याप त्यांच्या लग्नाची तारीख निश्चित झाली नाही. अशात तिने साखरपुड्याचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

सोनाली कुलकर्णीने सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोंनी चाहत्यांचे लक्ष वेधले आहे. या फोटोत ती एकदम पारंपारिक वेशभूषेत दिसत आहे. यामुळे तिच सौंदर्य आणखीच खुलले आहे. या साडीमध्ये ती अगदी अप्सरा दिसत आहे.

सोनालीने यावेळी मराठमोळा साज केला होता. साडीसोबत नाकात नथ, कानात झुमके, गळ्यात मोत्याची माळ, हळद कुंकू अशा लूकमध्ये तिने फोटो शेअर केले आहेत. ‘साखरपुड्याच्या पलीकडे आणि लग्नाच्या अलीकडे’ असा मितवा सिनेमामधील डायलॉगप्रमाणे या फोटो पोस्टला सोनालीने मजेशीर कॅप्शन दिले आहे.

फोटोत सोनाली मिठाईच्या ताटाकडे पाहताना दिसत आहे. तिच्या या फोटोवर नेटकऱ्यांना हसू आवरता येत नाही. ‘मी अशी नाहीये, फक्त हे क्षण असे टिपले गेले’ असेही कॅप्शन तिने या फोटोसाठी दिले आहे.

दरम्यान, या फोटोंना एक वर्ष पुर्ण झाले आहे. अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचा साखरपुडा गेल्या वर्षी २ फेब्रुवारीला झाला होता. याची गोड आठवण काढत तिने हे फोटो पोस्ट केले आहेत.

महत्वाच्या बातम्या-
मानसी नाईकनंतर मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता अडकली विवाहबंधनात, पहा लग्नाचे सुंदर फोटो
बॉलीवूड कपल्सच्या लव्ह स्टोरीमध्ये खलनायक बनले होते आई वडील; बघा कोणत्या आहेत ‘त्या’ जोड्या
करोडोंच्या संपत्तीचे मालक आहेत अमिताभ बच्चन; पण त्यांचा भाऊ आजही जगतो हालाकीचे जीवन
…म्हणून विरुष्काच्या लेकीचं नाव आहे खास; जाणून घ्या या नावामागचा अर्थ

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.