९० च्या दशकातील सर्वात मोठा सुपरहिरो ‘शक्तिमान'(Shaktimaan) पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचा टीझर यापूर्वीच प्रेक्षकांच्या समोर आला आहे. आता चाहते या चित्रपटाच्या ट्रेलरची वाट पाहत आहेत. काही दिवसांपूर्वी सोनी पिक्चर्स यांनी नुकतीच सोशल मीडियावर एक पोस्ट करून ‘शक्तिमान’ मालिकेवर(Serial) आधारित चित्रपटाची घोषणा केली होती.(photo-actor nukul mehta play shaktimaan charcter)
या चित्रपटात ‘शक्तिमान’ ची भूमिका नेमका कोणता अभिनेता साकारणार आहे, याबद्दल प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली आहे. नुकतेच एका अभिनेत्याने एक खास पोस्ट सोशल मीडियावर(Social Media) शेअर केली आहे. या पोस्टची सध्या सोशल मीडियावर चर्चा होत आहे. प्रसिद्ध टीव्ही अभिनेता नकुल मेहताने ‘शक्तिमान’ मालिकेतील अभिनेता मुकेश खन्ना यांच्यासोबतचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.
या फोटोला अभिनेता नकुल मेहताने ‘शक्तिमान यांच्यासोबत शूटिंग करत आहे’, असे कॅप्शन दिले आहे. या फोटोमध्ये अभिनेता नकुल मेहताने मुकेश खन्ना यांना देखील टॅग केले आहे. या फोटोमुळे ‘शक्तिमान’ चित्रपटात अभिनेता नकुल मेहता प्रमुख भूमिका साकारणार असल्याची चर्चा सोशल मीडियावर होत आहे.
आता ‘शक्तिमान’च्या व्यक्तिरेखेवर चित्रपट बनवण्याची तयारी सुरू झाली आहे. हा चित्रपट तीन भागात बनवला जाणार आहे. सोनी पिक्चर्स या चित्रपटाची निर्मीती करणार आहे. नुकताच या चित्रपटाचा टीझर देखील समोर आला आहे. ‘शक्तिमान’ ही मालिका १३ सप्टेंबर १९९७ रोजी दूरदर्शनवर प्रसारित झाली होती.
या मालिकेत अभिनेता मुकेश खन्ना यांनी गंगाधर आणि शक्तिमान या दोन भूमिका साकारल्या होत्या. ‘शक्तिमान’ ही मालिका २००५ साली बंद झाली.
नकुल मेहता एक प्रसिद्ध टीव्ही अभिनेता आहे. त्याने ‘जो प्यार का दर्द है’ या मालिकेमध्ये आदित्य कुमारची मुख्य भूमिका साकारली होती. याशिवाय त्याने स्टार प्लसच्या ‘इश्कबाज’ मालिकेत देखील शिवाय सिंग ओबेरॉय नावाची मुख्य भूमिका साकारली आहे.
अभिनेता नकुल मेहता सध्या अभिनेत्री दिशा परमारसोबत ‘बडे अच्छे लगते हैं २’ या मालिकेमध्ये काम करत आहे. ‘शक्तिमान’ या चित्रपटात मुख्य भूमिकेत कोण असणार याची चर्चा अजून देखील सुरू आहे. नव्या युगाचा ‘शक्तिमान’ कोण होणार, याची प्रतिक्षा चाहते करत आहेत. तसेच या चित्रपटातील इतर भूमिका कोण साकारणार आहे, याबद्दलची माहिती अद्याप समोर आली नाही.
महत्वाच्या बातम्या :-
गणिताच्या तासाला बाईंकडे एकटक पाहत बसायचा हेमंत ढोमे, एकदा बाईंना कळलं अन्.., वाचा भन्नाट किस्सा
अमृता फडणवीसांनी शेअर केला ‘शिव तांडव स्रोत’चा पहिला पोस्टर, ‘या’ तारखेला गाणं येणार प्रेक्षकांच्या भेटीला
मोठी बातमी! ईडीने नवाब मालिकांना घेतलं ताब्यात, पहाटे पहाटे केली धडक कारवाई