फोन टॅपिंग प्रकरण विरोधकांवरच उलटले! सायबर सेलमध्ये गुन्हा दाखल; देवेंद्र फडणवीसांच्या चौकशीची शक्यता

मुंबई | फोन टॅपिंग प्रकरणात आता आणखी काही नवे खुलासे होण्याची शक्यता आहे. फोन टॅपिंग अहवाल लीक केल्याप्रकरणी अज्ञाताविरोधात  मुंबईच्या सायबर पोलीसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच याप्रकरणात देवेंद्र फडणवीस यांची चौकशी होण्याची शक्यता आहे.

गुप्तचर विभागाची गोपनीय पत्रे बेकायदेशीर रित्या मिळवण्यात आली होती. असे दाखल केलेल्या तक्रारीत म्हटले आहे. त्यानुसार ऑफिशियल सिक्रेट ऍक्ट १९३० च्या शाखा ५ च्या अंतर्गत भारतीय टेलीग्राम अधिनियम १८८५ च्या कलम ३० अन्वेये अज्ञात व्यक्तीविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, फोन टॅपिंगमधून पोलिस अधिकाऱ्यांच्या इच्छित ठिकाणी बदल्यांचे रॅकेट असल्याचा आरोप विरोधकांनी महाविकास आघाडी सरकारवर केला आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सरकार आल्यापासून गृहमंत्र्यांसह काही मंत्र्यांचे फोन टॅप होत असल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे.

वृत्त अहवालानुसार फोन टॅपिंग प्रकरणात पोलीस विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचीही चौकशी करू शकतात. त्याचबरोबर आयपीएस अधिकारी आणि गुप्तचर विभागाच्या माजी आयुक्त रश्मी शुल्का यांना काही दिवसांत चौकशीसाठी बोलावले जाऊ शकते.

२५ ऑगस्ट २०२० रोजी तत्कालीन गुप्तचर आयुक्त रश्मी शुक्ला यांनी एका गुप्त माहितीच्या आधारे अतिरिक्त मुख्य सचिव यांच्याकडून परवानगी घेतल्यानंतर काही फोन टॅप केले होते. मात्र मुख्य सचिवांनी मुख्यमंत्र्यांना आता याबाबतचा अहवाल सादर केला. यामध्ये दहशतवाद यासारखी कृती पकडण्यासाठी फोन टॅप करण्याची परवानगी दिली असल्याचे म्हटले आहे.

दरम्यान, रश्मी शुक्ला यांना दिल्या गेलेल्या परवानगीचा गैरवापर करत त्यांनी भारतीय टेलीग्राफ कायद्यतील तरतुदींना डावलले आहे. तर काही दिवसांपुर्वी देवेंद्र फडणवीस यांनी रश्मी शुक्ला यांच्या टॉप सिक्रेट कागदपत्रांचा दाखला देत बदली रॅकेट उघडकीस आणले होते. आता याप्रकऱणी पोलिसांच्या चौकशीला त्यांना सामना करावा लागण्याची शक्यता आहे.

महत्वाच्या बातम्या-
रश्मी शुक्लांनी भाजपात जाण्यासाठी माझ्यावर दबाव आणला; राजेंद्र पाटील यड्रावकरांचा खुलासा
माजी पोलीस अधिकाऱ्याने गंभीर आरोप केलेले ते बंटी बबली म्हणजे फडणवीस आणि रश्मी शुक्ला?
“महाराष्ट्रात सरकार बनत असताना रश्मी शुक्लांनी नेत्यांचे फोन टॅप केले, त्या भाजपच्या एजंट”
“होय रे बाबा घेतली मी लस, पण फोटो काढला नाही”, अजित पवारांचा टोला

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.