शिवसेनेचे जेष्ठ नेते आणि कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे यांनी ४६ आमदारांना सोबत घेऊन पक्षाविरोधात बंडखोरी केली आहे. या बंडखोरीनंतर महाराष्ट्रात राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शिंदे गटाला भाजपचा पाठिंबा असल्याची माहिती मिळत आहे. देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे(Eknath Shinde) यांची गुप्त भेट झाल्याचे देखील सांगितले जात आहे.(Phone conversation between Raj Thackeray and Eknath Shinde)
या भेटीत सरकार स्थापन करण्यासंदर्भात चर्चा झाल्याचे सांगितले जात आहे. यादरम्यान एकनाथ शिंदे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यात देखील फोनवरून चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे. एकनाथ शिंदे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना फोन करून महाराष्ट्रातील सध्याच्या राजकीय परिस्थितीबाबत चर्चा केली असल्याचे सांगितले जात आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर काही दिवसांपूर्वी शस्त्रक्रिया झाली आहे. राज ठाकरे यांना काल रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. एकनाथ शिंदे यांनी राज ठाकरेंना फोन करून त्यांच्या तब्येतीची देखील विचारपूस केली आहे. महाराष्ट्रात निर्माण झालेल्या राजकीय परिस्थितीसंदर्भात दोन्ही नेत्यांमध्ये फोनवरून खूप वेळ चर्च झाली असल्याची माहिती मिळत आहे.
यामुळे सध्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या ३८ आणि अपक्ष ८ अशा एकूण ४६ आमदारांना सोबत घेऊन पक्षाविरोधात बंड केले आहे. एकनाथ शिंदे यांनी वेगळा गट स्थापन करण्याचा देखील निर्णय घेतला आहे. या गटाला हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे.
शिवसेनेने मात्र एकनाथ शिंदे यांच्या गटाला विरोध केला आहे. शिवसेनेकडून बंडखोर आमदारांवर कारवाई होणार असल्याची माहिती मिळत आहे. शिवसेनेने १२ बंडखोर आमदारांची आमदारकी रद्द करण्यात यावी, अशी मागणी विधानसभा उपाध्यक्षांकडे केली आहे. शिंदे गट आणि भाजपकडून सरकार स्थापन करण्यासाठी मोठ्या प्रमाणात हालचाली करण्यात येत आहेत.
महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी सक्रिय झाल्यामुळे सर्व बंडखोर आमदार मुंबईला येणार असल्याचे सांगितले जात आहे. शिवसेनेचे सर्व बंडखोर आमदार ४८ तासांत गुवाहाटीहून मुंबईला येणार असल्याची माहिती मिळत आहे. यासाठी भाजपकडून विशेष प्लॅन तयार करण्यात आल्याचे काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले आहे.
महत्वाच्या बातम्या :-
मोठी बातमी! एकनाथ शिंदे आणि राज ठाकरेंमध्ये चर्चा, सत्तेची नवी समीकरण तयार होणार
शिवसेनेच्या ठाणे जिल्हाप्रमुखपदी आनंद दिघेंच्या पुतण्याची नियुक्ती? स्वत:च खुलासा करत म्हणाले..
अखेर भाजप-शिंदे गटाचा सत्तास्थापनेचा फॉर्म्युला ठरला! पहा शिंदे गटातील कोण कोण मंत्री होणार..