देवेंद्र फडणवीस ठरले सुपरहिरो; स्वीकारले १०० अनाथ मुलांचे पालकत्व

देवेंद्र फडणवीस राज्याच्या सरकारवर दरवेळी टीका करत असतात. त्यांच्या या स्वभावामुळे त्यांची राज्यात नकारात्मक प्रतिमा तयार झाली आहे. पण त्यांनी आता त्यांच्या एका कृतीतून सर्वांची मने जिंकली आहेत.

केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांच्या वाढदिवसानिमित्त नागपूरच्या एका संस्थेकडून सोबत हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कोरोनाच्या काळात आई वडील गमावलेल्या मुलांना आधार देण्याचे काम ही संस्था करणार होती.

या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. त्यांनी कार्यक्रमाच्या पहिल्याच दिवशी १०० मुलांचे पालकत्व स्वीकारून एक चांगला संदेश दिला आहे. त्यांच्या या निर्णयामुळे त्यांनी सर्वाची मने जिंकली आहेत.

नागपुरचे माजी महापौर संदीप जोशी हे सिद्धिविनायक ट्रस्टचे अध्यक्ष असून ते अनाथ मुलांसाठी काम करतात. सध्या कोरोनाच्या काळात अनेकांनी त्यांच्या घरातील लोकांना गमावले आहे. या काळात त्यांना आधार देण्याचे काम या संस्थेने केले आहे.

या संस्थेत पहिल्या दिवशी नोंदणी झालेल्या तब्बल १०० मुलांची जबाबदारी देवेंद्र फडणवीस यांनी घेतली आहे. सोबतच त्यांनी त्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी घेताना भविष्यात पण मदतीचे आश्वासन दिले आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी पुढे म्हटले आहे की, यासाठी जी सिस्टीम लावायची आहे ती तुम्हाला लावावी लागेल पण त्यासाठी करावी लागणारी मदत मी करणार आहे. यावेळी फडणवीस यांनी केलेल्या कृतीतून समाजात एक चांगला संदेश गेला आहे.

ताज्या बातम्या
स्वातंत्र्यवीर सावरकरांवर येणार बायोपिक, मराठीतील ‘हा’ दिग्गज दिग्दर्शक करणार दिग्दर्शन

‘इंडियन आयडॉल 12’मधून बाहेर काढण्याची मागणी, षण्मुखप्रियासाठी दाक्षिणात्य इंडस्ट्री मैदानात

सचिन पिळगावकर करतोय लक्ष्याला मिस, सोशल मिडीयावर शेअर केला जुना फोटो

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.