गुड न्यूज! फायझरची लस ९०% प्रभावी; लवकरच विक्रीला मंजुरी?

मुंबई | जगभरात कोरोना विषाणूचा हाहाकार सुरूच आहे. या परिस्थितीत आता आशेचा एक किरण दिसू लागला आहे. फायझर कंपनीची कोरोना लस नुकत्याच झालेल्या चाचणीत ९० टक्के यशस्वी ठरली आहे. फायझर आणि तिची जर्मन सहयोगी कंपनी बायोएनटेक यांनी ही लस संयुक्तपणे तयार केली आहे.

याचबरोबर पुढील काही चाचण्या व्यवस्थित पार पडल्यास आणि सर्व परवानग्या वेळेत मिळाल्यास फायझरला याच महिन्याच्या अखेरपर्यंत लस विक्रीची परवानगी मिळू शकते. तिसऱ्या टप्प्यात लसीची ९४ कोरोना रुग्णांवर चाचणी घेण्यात आली. त्यापैकी ९० टक्के रुग्णांवर लसीचा सकारात्मक परिणाम दिसल्याची माहिती फायझरनं दिली आहे.

तसेच लशीचा उपयोग १६ ते ८५ वयोगटातील लोकांवर तातडीने करण्यासाठी या महिनाअखेरीस अमेरिकेच्या नियंत्रकांकडे अर्ज करण्याचे संकेतही कंपनीने दिले आहेत. बहुतांश रुग्णांवर सकारात्मक परिणाम दिसल्यानं फायझरची लस लवकरच बाजारात दाखल होऊ शकते.

दरम्यान, ‘करोना या जागतिक संकटाच्या अंतासाठी महान शोधाची गरज असताना आम्ही त्या दिशेने महत्त्वाचे पाऊल टाकले आहे, असे फायझरचे मुख्य कार्यकारी अधिकारी अल्बर्ट बॉरुला यांनी म्हटले आहे.

तसेच अभिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार ‘हे वर्ष संपण्याआधी कोणतीही करोना प्रतिबंधक लस येण्याची शक्यता नाही, सुरुवातीला या लशीच्या मर्यादित पुरवठय़ाचे रेशनिंग केले जाईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.