गुड न्यूज! ‘या’ कंपनीने केंद्राकडे मागितली कोरोना लसीकरणाची परवानगी

मुंबई | देशात कोरोना विषाणूचा हाहाकार सुरु आहे. अशातच सर्वांचे लक्ष कोरोना लसीकडे लागले आहे. औषध निर्माता कंपनी फायझरने भारत सरकारकडे कंपनीने विकसित केलेल्या कोरोना लसीच्या आपत्कालीन लसीकरणासाठी परवानगी मागितली आहे.

यामुळे आता लवकरच कोरोना लस बाजारात येईल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार कंपनीने दिलेल्या अर्जात देशात कोरोना लसीची आयात आणि वितरण संबंधी मंजुरी मागितली आहे.

तसेच भारतीय औषध महानियंत्रक (डीसीजीआय़) कडे pfizer india ने रितसर अर्ज केला आहे. महत्वाची बाब म्हणजे लसीला ब्रिटन आणि बहारीनने आपत्कालीन लसीकरणाची मंजुरी दिली आहे.

मॉडर्ना लस कोरोनावर १००% प्रभावी…

अमेरिकेतील मॉडर्ना कंपनीने कोरोना लशीबाबत एक दिलासादायक माहिती दिली आहे. ट्रायलमध्ये आपली लस ९४.१ % परिणामकारक असल्याचे मॉडर्नाने सांगितले आहे. तर गंभीर कोरोनावर ही लस १०० टक्के प्रभावी ठरली असल्याचा असा दावा देखील करण्यात आला आहे.

याबाबत मॉडर्ना कंपनीने तिसऱ्या टप्प्यातील अहवाल जारी केला आहे. यात दिलेल्या माहितीनुसार ३०.००० लोकांवर लशीची चाचणी केली. त्यामध्ये १९६ कोरोना रुग्णांचा समावेश होता. या रुग्णांवर ही लस १०० टक्के परिणामकारक असल्याचे समजत आहे.

कोरोना लस वाटपासाठी मोदी सरकारने तयार केला प्लॅन…

कोरोना लस वेळेत सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावी यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकार आरखडा तयार करण्याच्या तयारीत आहे. सरकार प्रत्येक राज्यात ब्लॉक स्तरावर ब्लॉक टास्क फोर्स तयार करेल. याबाबत बुधवारी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.

महत्त्वाच्या बातम्या
हजारो कोटींची संपत्ती मागे सोडून गेले MDH मसाल्याचे मालक गुलाटी; एकून संपत्ती पाहून डोळे पांढरे होतील
डॉ. शीतल आमटे आत्मह.त्या प्रकरणात धक्कादायक माहिती; कुत्र्यांसाठीचे इंजेक्शन टोचून आत्मह.त्या?
दिलजीत आला शेतकऱ्यांसाठी धावून; एक कोटींची मदत करत केंद्र सरकारला केली ही विनंती

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.