आता पेट्रोलच टेन्शन मिटलं, ही गाडी एकदा चार्जिंग केली की १५० किलोमीटर धावतेय, जाणून घ्या..

गेल्या काही दिवसांपासून पेट्रोलच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. यामुळे गाड्या फिरवणे अशक्य झाले आहे. पेट्रोलच्या वाढत्या किमतीमुळे सर्वसामान्य लोकांना याचा तोटा सहन करावा लागत आहे. यामुळे लोकांचे आर्थिक बजेट कोलमडले आहे.

यामुळे आता इलेक्ट्रिक बाइक बाजारात येऊ लागल्या आहेत. चार्जिंग केल्यावर दीडशे किलोमीटरपर्यंत या गाड्या धावत आहेत. यामध्ये रिव्होल्ट मोटर्सने इलेक्ट्रिक बाइक्स आरव्ही 400 (RV400) ही गाडी एकदा चार्जिंग केली की १५० किलोमीटर पर्यंत जात आहे.

या गाडीचे टॉप स्पीड ताशी ८५ किमी आहे. कंपनीने यात ३.२४ किलोवॅट क्षमतेची बॅटरी दिली आहे. बॅटरीसह कंपनीकडून १,५०,००० किलोमीटरची वॉरंटी देण्यात आली आहे. यामुळे ही गाडी एक सर्वोत्तम गाडी ठरली आहे.

या गाडीची बॅटरी पूर्णपणे चार्ज होण्यासाठी एकूण साडेचार तास लागतात. ही बाईक डेडिकेटेड MyRevolt मोबाइल अ‍ॅपसह सादर करण्यात आली आहे. यामुळे ती पावरफुल ठरते.

यामुळे ही गाडी एकदा चार्जिंग केली की १५० किलोमीटर पर्यत जाऊ शकते, म्हणजेच आपल्याला कोठे लांब जायचे असल्यास काही अडचण येणार नाही. तसेच या गाडीसोबत कंपनी ८ वर्षांची आणि १.५ लाख किलोमीटरपर्यंतची वाँरंटी देते.

जी इतर कोणतीही कंपनी देत नाही. या गाडीची किंमत एक्स शोरूम १.१८.९९९ इतकी आहे. सध्या या गाड्यांची बुकिंग बंद आहे, कारण गाड्या खुप खरेदी केल्याने कंपनीकडे गाड्या शिल्लक नाहीत. मात्र लवकरच ती सुरू होईल.

ताज्या बातम्या

सैराटफेम आर्चीला मनापासून आवडतो ‘हा’ अभिनेता, स्वत: तिनेच उघड केलं गुपित, नाव ऐकून थक्क व्हाल!

VIDEO: अजबंच! कुत्र्याने केला महिलांसोबत व्यायाम; त्याचा व्यायाम पाहून नेटकरी पण झाले हैराण

देशातील सर्वात लहान कोरोना योद्धा; १० दिवस व्हेंटिलेटरवर राहून हरवले कोरोनाला

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.