भाजप नेत्याची मागणी; पेट्रोलची किंमत ४० रुपये लिटर हवी, ही तर सर्वसामान्यांची पिळवणूक

नवी दिल्ली | देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढतच चालल्या आहेत. पेट्रोलने अनेक शहरांमध्ये नव्वदी पार केली आहे. यासंदर्भात भाजपा नेते आणि राज्यसभा खासदार सुब्रमण्यम स्वामींनी पेट्रोलचे दर ४० रुपये प्रति लिटर असायला हवेत असे मत व्यक्त केले आहे.

 

पेट्रोलचे दर देशात ९० रुपये प्रति लिटर झाले असून ती देशातील सर्वसामान्य नागरिकांची मोठी पिळवणूक असल्याचं स्वामींनी म्हटले आहे. पेट्रोलच एक्स रिफायनरी मूळ किंमत ३० रुपये प्रति लिटर एवढी आहे. मात्र, सर्व प्रकारचे टॅक्स आणि पेट्रोल पंपाचे कमिशन मिळून ही किंमत ६० रुपयांनी वाढते.

 

त्यामुळे, पेट्रोलचे प्रति लिटर दर ९० रुपये एवढे आहेत. माझ्या मते पेट्रोलच जास्तीत जास्त किंमत 40 रुपये प्रति लिटर असणे आवश्यक आहे. अशी माहिती सुब्रमण्यम स्वामी यांनी ट्विट करुन दिली.

 

 

 

इंधन दरवाढीमुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये नाराजीचा सूर पाहायला मिळत आहे. पेट्रोल आणि डिझेलचे दर दोन वर्षांतील उच्चांकी पातळीवर पोहोचले आहेत. सोमवारी तेल कंपन्यांनी पेट्रोल २८ पैसे तर डिझेल २९ पैसे प्रतिलिटर वाढविले आहेत.

 

त्यामुळे अनेक शहरांमध्ये पेट्रोलने नव्वदीचा टप्पा ओलांडला आहे. पेट्रोलचे दर ९० पार केल्यानंतर देशातील सर्वसामान्य नागरिकांकडून रोष व्यक्त होत आहे. तर, भाजप खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी पेट्रोलचे दर ४० रुपये प्रति लिटर असायला हवे असं म्हटले आहे.

 

दरम्यान, लॉकडाऊनच्या कालावधीत स्थिर ठेवले पेट्रोल आणि डिझेलचे दर १ जूनपासून वाढत आहेत. गेल्या १७ दिवसांमध्ये पेट्रोलचे दर २.३५ रुपयांनी तर डिझेलचे दर ३.१५ रुपयांनी वाढले आहेत.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.