पेट्रोल १०५ रुपयांवर! सामान्य नागरिकांना झटका, १२ दिवसात २ रुपयांनी महागले इंधन

नवी दिल्ली । कोरोना महामारीमुळे अनेक नागरिकांचे हाल होताना दिसत आहेत. अनेक नागरिकांने रोजगार बंद झालेले आहेत. कोरोनाच्या अश्या भयानक परिस्थितीमध्ये गेल्या काही दिवसांपासून पट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत भरमसाठ वाढ होताना दिसत आहे. यामुळे मोदी सरकार विरुद्ध नाराजी व्यक्त केली जात आहे.

सामान्य माणसांसाठी गेल्या काही दिवसांपासून वाढणारे पट्रोल आणि डिझेलचे दर डोकेदुखी ठरत आहे. फक्त जून महिन्यात पट्रोलचे दर जवळपास २ रुपयांनी वाढले आहेत. या दर वाढीनंतर देशातील अनेक शहरात पोट्रोलचे दर १०५ रुपये प्रति लिटरच्या जवळपास गेलेले आहेत.

मुंबईत आज पट्रोलचे दर १०२.३० रुपये तर डीझलचे दर ९४.९८ रुपये प्रति लिटर आहेत. फक्त १२ दिवसात देशभरात पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत वाढ झाली आहे. जूनमध्ये केवळ १२ दिवसात पेट्रोलचे दर १.६३ रुपयांनी वाढले आहेत. तर डिझेलचे दर देखील १.६० रुपये प्रति लीटरने वाढले आहे. देशात दररोज सकाळी ६ वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती बदलत असतात.

नवीन दर सकाळी ६ वाजल्यापासून लागू होतात. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत अबकारी शुल्क, डीलर कमिशन आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत जवळजवळ दुप्पट होते. परदेशी चलनांच्या आधारावर आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये कच्च्या तेलाच्या किंमती काय आहेत, या आधारावर रोज पेट्रोल आणि डिझेलच्या दरात बदल होत असतात.

देशातील महत्वाच्या शहरातील इंधनाचे दर आज अशाप्रकारे आहेत. दिल्ली – ९६.१२ रुपये प्रति लीटर आणि डिझेल ८६.९८ रुपये प्रति लीटर, मुंबई – १०२.३० रुपये प्रति लीटर आणि डिझेल ९४.३९ रुपये प्रति लीटर, कोलकाता – ९६.०६ रुपये प्रति लीटर आणि डिझेल ८९.८३ रुपये प्रति लीटर, चेन्‍नई – ९७.४३ रुपये प्रति लीटर आणि डिझेल ९१.६४ रुपये प्रति लीटर, बेंगळुरु – ९९.३३ रुपये प्रति लीटर आणि डिझेल ९२.२१ रुपये प्रति लीटर आहेत.

तसेच नोएडा – ९३.४६ रुपये प्रति लीटर आणि डिझेल ८७.४६ रुपये प्रति लीटर, जयपूर – १०२.७३ रुपये प्रति लीटर आणि डिझेल ९५.९२रुपये प्रति लीटर, भोपाल – १०४.२९ रुपये प्रति लीटर आणि डिझेल ९५.६० रुपये प्रति लीटर श्रीगंगा नगर – १०७.२२ रुपये प्रति लीटर आणि डिझेल १००.०५ रुपये प्रति लीटर, रीवा – १०६.५१ रुपये प्रति लीटर आणि डिझेल ९७.६५ रुपये प्रति लीटर आहेत.

ताज्या बातम्या

त्यादिवशी अंधश्रद्धेमुळे ९०० पेक्षा जास्त लोकांनी केली होती आत्महत्या; जाणून घ्या ‘त्या’ भयानक घटनेबद्दल

“तुझ्या वयाच्या अभिनेत्री सोबत काम कर” सोफिया हयातने घेतला सलमान खानशी पंगा

सोफिया हयातचा सलमानवर निशाणा; ‘या’ अभिनेत्याचे करिअर बरबाद केल्याचा सलमानवर आरोप

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.