खुशखबर! पेट्रोल-डिझेल होणार स्वस्त, मोदी सरकारचे मोठे संकेत

मुंबई : पेट्रोल, डिझेलच्या दरांमुळे सर्वसामान्य नागरिकांचं कंबरडं मोडलं आहे. त्यामुळे महागाई वाढली आहे. पेट्रोल, डिझेलवरील कर कमी करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे. अशातच पेट्रोल आणि डिझेल वापरकर्त्यांसाठी खूप चांगली बातमी आहे.

अर्थमंत्री निर्मला सीतारामन लोकसभेत वित्त विधेयक-२०२१ वर चर्चा करताना पेट्रोल, डिझेलवर बोलल्या. जीएसटी परिषदेच्या पुढील बैठकीत पेट्रोल, डिझेलवर चर्चा करण्यात येईल, असे सीतारामन म्हणाल्या. सरकार यासाठी तयार असल्याचे त्यांनी सांगितले.

‘पेट्रोल, डिझेलला जीएसटीच्या अंतर्गत आणण्यासाठी पुढील जीएसटी परिषदेत चर्चा केली जाईल. केंद्राची तशी तयारी आहे,’ असे सीतारामन यांनी म्हटले आहे. जीएसटी परिषदेच्या पुढील बैठकीत पेट्रोल-डिझेलला जीएसटीच्या कक्षेत आणण्यासाठी तयार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

पेट्रोल, डिझेलचा समावेश जीएसटीमध्ये करण्यास राज्यं तयार असल्यास त्यांनी पुढे येऊन चर्चेचा प्रस्ताव द्यावा. आगामी जीएसटी परिषदेच्या बैठकीत यावर चर्चा झाल्यास आनंदच होईल, असे सीतारामन म्हणाल्या.

दरम्यान, असे झाल्यास संपूर्ण देशाला लवकरच महागाईपासून मोठा दिलासा मिळू शकेल, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. या वर्षात मध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत २६ वेळा वाढ झाली आहे. जानेवारीत १० वेळा, तर फेब्रुवारीमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत १६ वेळा वाढ करण्यात आली आहे.

महत्त्वाच्या बातम्या 

‘राष्ट्रवादीवाले स्वतःला फार मोठे समजतात पण एक महिला किंवा पोलीसवाला त्यांची वाट लाऊन जातात’

अनिल देशमुखांना वाचवणारे शरद पवारांचे सगळे मुद्दे फडणवीसांनी पुराव्यानिशी खोडले; वाचा..

…त्यामुळे दिल्लीतील शरद पवारांच्या पत्रकारपरिषदेत खोटेपणा उघडा पडला – देवेंद्र फडणवीस

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.