१८ वर्षांपुढील व्यक्तींना लसीकरणासाठी ‘अशी’ करावी लागेल नोंदणी; जाणून घ्या..

दिल्ली । केंद्र सरकारने काल एक मोठा निर्णय घेतला. यामध्ये आता १८ वर्षांनपुढील सर्वांना लसीकरण केले जाणार आहे. गेल्या काही दिवसांपासून वाढलेल्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने हा निर्णय घेतला. यामुळे दिलासा मिळाला आहे.

१ मेपासून १८ वर्षांपुढील सर्वांना कोरोनावरील लस मिळण्यास सुरुवात होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी डॉक्टर्ससोबत बैठक घेतली होती. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. सरकारी हॉस्पिटल्समध्ये मोफत तर खासगी हॉस्पिटल्समध्ये काही किंमत मोजावी लागेल.

ही लस घेण्यासाठी CoWIN ऍपवर नोंदणी करावी लागणार आहे. cowin.gov.in या वेबसाईटवर आधार कार्ड नंबर किंवा मोबाईल नंबर भरा, तुम्हाला ओटीपी मोबाईलवर मिळेल, नंबर टाकून रेजिस्ट्रेशन करावे लागेल.

तसेच आधारकार्ड, पॅनकार्ड, मतदानकार्ड, ड्रायव्हिंग लायसेन्स, पासपोर्ट यापैकी एक प्रूफ तुमच्याकडे असणे गरजेचे आहे. ही नोंदणी केल्यानंतर तुमच्या वेळेची बचत होणार आहे.

भारतीय लस निर्मिती कंपन्या ५० टक्के पुरवठा केंद्र सरकारला करतील आणि उर्वरित ५० टक्के राज्य सरकार आणि ऑपन मार्केटमध्ये करु शकणार आहेत. देशात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. यामुळे केंद्र सरकारने या लसीकरणाचा निर्णय घेतला आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.