या’ व्यक्तिने दिली सुशांतचा मित्र सॅम्यूअलला जीवे मारण्याची धमकी

सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूला एवढे दिवस झाले तरी लोक अजून त्याच्या मृत्यूला विसरु शकले नाहीत. सुशांतने १४ जुन रोजी त्याच्या मंबईतील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. या घटनेमूळे सर्वांनाच धक्का बसला होता. त्यानंतर या प्रकरणात अनेक गोष्टींचा खुलासा होत आहे.

सुशांतच्या मृत्यूनंतर अनेक गोष्टींवरुन वाद निर्माण झाला आहे. सुशांतच्या प्रकणात ड्रग अँगल देखील समोर आले आहे. यानंतर बॉलीवूडच्या अनेक कलाकारांची नावे यात समोर आली आहेत. त्यामूळे या प्रकरणातील गुंता दिवसेंदिवस वाढत आहे.

या प्रकरणात एनसीबी अनेकांची चौकशी करत आहे. पण सत्य अजून समोर आले नाही. याच सर्व प्रकरणात सुशांतचा मित्र सॅम्यूअल हॉकीपला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. सुशांतच्या एका चाहत्याने सॅम्यूअलला ही धमकी दिली आहे.

तसनीन नावाच्या व्यक्तिने सोशल मीडीयाच्या माध्यामातून सॅम्यूअलला जीवे मारण्याची धमकी दिली आहे. त्यानंतर सॅम्यूअलने या प्रकरणात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस या प्रकरणाची तपासणी करत आहेत.

तसनीन म्हणला की,’ शपथ घेऊन सांगतो की, तुला अफसोस देखील करायचा वेळ मिळणार नाही. तयार राहा. तुला चित्रपट माफीयांनी वाचवले असेल. पण जगातील कित्येक लोकांच्या सुड घेण्याच्या भावनेपासून कसा वाचशील? अनेक मोठे वेब हॅकर्स आम्हाला साथ देत आहेत’.

महत्त्वाच्या बातम्या –

रियावर खोटे आरोप करणाऱ्यांना सोडणार नाही; पहा कुणी दिलीय ही धमकी

सुशांत प्रकरणी आणखी एका अभिनेत्रीने केला खुलासा; दाखवली बाॅलीवूडची काळी बाजू

भारतात ड्रग्ज कायदेशीर करा; ‘या’ बाॅलीवूड अभिनेत्याने केली धक्कादायक मागणी

केवळ आईसक्रीमसाठी अजय देवगनने १० तास थांबवली शुटींग; पहा नेमकं काय घडलं..

शेतकऱ्यांना नडणाऱ्या कंगनाला भिडला शेतकरी; चांगलाच उतरवला माज

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.