लोकांना वाटतं गडकरी जवळ हरामचा माल आहे,म्हणून इथून पुढं…..

नागपुर | रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी नागपुरात रस्ते सुरक्षा कार्यक्रमात उपस्थित लोकांसमोर तुफान फटकेबाजी केली.  यापुढे काहीच फुकट देणार नाही फुकट दिलं तर लोकांना वाटतं गडकरी जवळ खूप हरामचा माल आहे. म्हणून इथून पुढे काही द्याचं असेल तर एक रूपया तरी घेणार असं म्हणतं चिमटे काढले आहेत.

नितीन गडकरी म्हणाले की, गाईच्या शेणापासून भारतात पेंट तयार करण्यत येत आहे. शेण ५ रूपये प्रतिकिलो दराने विकले जाईल. तसेच ब्राझील मधून गीर गाईचे वीर्य भारतात आणलं आहे. त्यावर संशोधन सूरू आहे. त्यावर एक फिल्म बनवण्यात आली आहे. पण ही फिल्म फुकट दाखवणार नाही. त्यासाठी एक रूपयातरी घेणार नाहीतर माझ्याकडे हरामचा माल आहे असं लोकाना वाटायचं. असं त्यांनी म्हटलं आहे.

ते पुढे म्हणाले की, आपल्या देशात ड्रायव्हिंग लायसन्स अगदी सहजपणे मिळून जाते. देशात बनावट लायसन्स बनवणाऱ्यांची संख्याही वाढत आहे. रस्त्यावर  नो पार्किंग मध्ये वाहने लावली, चुकीच्या पध्दतीने वाहने चालवली तर  सरकारला फोटो पाठवयाचा मग दंडाचे अर्धे पैसे सरकारला आणि आणि अर्धे ज्याने फोटो पाठवला आहे त्याला मिळतील.

तसेच अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी नितीन गडकरी यांचे कौतूक केले आहे. ते म्हणाले की, रस्त्यांचा विकास करण्यात गडकरींनी सिंहाचा वाटा उचलला आहे. त्यांनी गेल्या दहा वर्षात चांगले रस्ते तयार करून स्थिती सुधरवली आहे. त्यामुळे त्यांच्या बद्दल आदर वाटतो.

महत्वाच्या बातम्या-
शेतकऱ्यांना शेण आणि सेंद्रीय कचऱ्यापासून मिळणार पैसे; वाचा काय आहे सरकारची योजना
मोदींच्या सख्ख्या पुतणीला भाजपनं तिकीट नाकारलं; वाचा का नाकारलं गेलं तिकीट?
गोपीचंद पडळकर, भूषणसिंह होळकर हे उपटसुंभ; राजकीय स्वार्थासाठी दोघांनी लाजलज्जा सोडली

 

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.